Mahad Violence Arrest: महाड हिंसाचार प्रकरणात आणखी एकाला अटक; आरोपी जाबरेचा निकटवर्तीय ताब्यात

नगरपरिषद निवडणूक राड्यानंतर पोलिसांची कारवाई तीव्र; आतापर्यंत दोन्ही गटांतील सहा आरोपी अटकेत
Violence
ViolencePudhari Photo
Published on
Updated on

महाड : महाड नगरपरिषद निवडणुक मतदान प्रक्रियेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात झालेल्या राड्यानंतर दोन्हीकडून परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये याआधीच काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले असताना गुरुवारी आणखी एका संशयित आरोपीस महाड शहर पोलिसांनी अटक केल्याची माहिती महाड शहर पोलीस ठाण्याच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत पोलिसांनी दोनही गटातील सहाजणांना ताब्यात घेतले आहे.

Violence
Maharashtra Coaching Classes: सरकारी शाळांतील समस्या झाकण्यासाठी कोचिंग क्लासेसना लक्ष्य; शिखर संघटनेची टीका

विजय रामचंद्र घरटकर (वय 46), राहणार टोळ बु, ता. महाड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून 7 जानेवारीच्या रात्री लोणेरे फाटा येथील नंदिनी एंटरप्राइजेस परिसरातून गोरेगाव पोलीस ठाण्याच्या सहकार्याने महाड शहर पोलिसांनी घरटकर याला ताब्यात घेतले.

Violence
Mumbai local train megablock: उद्या मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; ठाणे-वाशी ट्रान्स हार्बर मार्ग साडेपाच तास बंद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय घरटकर हा महाडमध्ये घडलेल्या गुन्ह्याप्रसंगी घटनास्थळी उपस्थित असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुशांत जाबरे याच्यासोबत विजय घरटकर उपस्थित असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. चौकशीदरम्यान आरोपीने देखील याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Violence
BMC Voting Training: मतदान प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्यांना दणका; अंतिम संधी आज

घरटकर यास न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या मारहाणीच्या घटनेत दोन्ही गटाकडून झालेल्या परस्परविरोधी गुन्ह्यात उच्च न्यायालयाने सर्व आरोपींना अटकपूर्व जामीन नाकारल्याने यातील प्रमुख आरोपी आदींवर अटकेची टांगती तलवार कायम असून यातील पुढील घडामोडींकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास महाड शहर पोलिसांमार्फत सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news