Lonere Minor Attacked: लोणेरेत क्रिकेटच्या वादातून 15 वर्षीय मुलावर कोयत्याने हल्ला; परिसरात खळबळ

खेळण्यास मनाई करूनही दुर्लक्ष केल्याचा राग; 76 वर्षीय आरोपीला गोरेगाव पोलिसांकडून अटक
Koyta Attack
Koyta AttackPudhari
Published on
Updated on

गोरेगांव : किरकोळ वादातून एका इसमाने 15 वर्षीय मुलावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी करण्याची घटना मंगळवारी लोणेरे येथे घडली.

Koyta Attack
Raigad Fort Shivaji Palace Reconstruction: रायगडवरील शिवरायांच्या राजवाड्याची रखडली पुनर्उभारणी

शेतीच्या बाजूला मालकीच्या असणाऱ्या ग्राऊंडवर क्रिकेट खेळण्यास मनाई केली असताना देखील ऐकून दुर्लक्ष केल्याचा राग मनात धरून आरोपी बाबुराम टेंबे, वय 76, मूळ रा. लोणेरे याने अनुराग रामधीरज गुप्ता, वय 15, रा. टेंबे चाळ लोणेरे याच्या मानेवर कोयत्याने वार केल्याने त्या मुलाला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.

Koyta Attack
Dombivli Fake Medicine Case: डोंबिवलीत बनावट रक्तदाबाच्या औषधांचा भांडाफोड; 8.94 लाखांचा साठा जप्त

हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर माणगांव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लोणेरे येथील विद्यापीठ रोड लगत एसएस निकम हायस्कूल शेजारी आरोपीच्या असणाऱ्या मालकीच्या क्रिकेट ग्राऊंडवर ही घटना घडल्याचे समोर आले आहे. लोणेरे येथील आपल्या नातेवाईकांकडे टेंबे चाळीत राहणाऱ्या एका परप्रांतीय मुलाला ग्राऊंडच्या कडेला असणाऱ्या शेतात चेंडू जाऊन नुकसान होतोय त्यामुळे येथे खेळू नका. या त्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केल्याचा राग मनात धरून आरोपी टेंबे याने मुलावर कोयत्याने वार केले. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

Koyta Attack
Maharashtra Gutkha Smuggling: ‘अन्न व औषध’चा गुप्त वार्ता विभाग गुटखा तस्करीकडे बेखबर? राज्यात खुलेआम विक्रीचा आरोप

विदयापीठ रोड लगत ही घटना घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाने लोणेरे परिसरात एकच खळबळ उडाली असून या घटनेची माहिती मिळताच गोरेगांव पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन आरोपी यांस अटक करण्यात आली आहे. याबाबत गोरगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास व्ही. बी. सुर्वे यांच्या मार्गदर्शना खाली सुरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news