Coconut price hike : ऐन गणपतीच्या सणामध्ये नारळ वधारणार

उत्‍पादन कमी झाल्याने दर वाढले; नारळाचा दर ५० रुपयांपर्यंत वाढणार; गृहिणींचे बजेट कोलमडणार
Coconut price hike
Coconut price hikepudhari photo
Published on
Updated on

पोलादपूर : किनारपट्टीला सलग ३ वर्षे आलेली वादळे, त्‍यात नारळाच्या झाडांचे झालेले मोठे नुकसान यामुळे कोकणात नारळ उत्‍पादन ३० टक्क्यांनी घटले आहे. श्रावण महिना ते गणपतीपर्यंत नारळाची मागणी जवळपास दुप्पट होते. मागणी वाढल्याने मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी स्थिती असल्यानेनारळाचे दर २० रुपर्यांवरून ५० रुपयांपर्यंत वधारले आहेत. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन हा नारळाचा पट्टा असूनही दर चढेच आहेत.

गणेशोत्सवाचे वेध लागताच सर्वसामान्यांच्या किचन बजेटला महागाईची झळ बसू लागली आहे. आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ मानल्या जाणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) वाशी येथील फळ आणि मसाला बाजारात नारळाची मोठ्या प्रमाणात झाली असली तरी गतवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा नारळला इतर साहित्य प्रमाणे नारळ गणपती दरम्यान महाग होण्याची शक्यता वाढीस लागली आहे.

Coconut price hike
Panvel bogus doctor : पनवेल-कसळखंडमध्ये बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

गतवर्षीच्या तुलनेत यंदा होलसेलसह किरकोळ बाजारात नारळाच्या दर प्रति नग साईज व प्रतवारी नुसार २५ पासून ४५ रुपये पर्यत आहे. येत्या दोन ते तीन दिवसात यामध्ये भाववाढ होण्याची शक्यता आहे त्याच प्रमाणे सुक्या खोबऱ्याचे भाव १० ते २० टक्क्यांनी वधारले आहेत.

भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतींपाठोपाठ आता धार्मिक विधी आणि पुजेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणाऱ्या नारळाच्या दरात आवक कमी जास्त प्रमाणात झाल्यास दरात स्थिरता दिसून येत असली तरी जास्त मागणी वाढल्यास प्रति नग १५ ते २० रुपयांनी होण्याची शक्यता व्यापारी वर्गाने व्यक्त केली आहे झाली. आगामी २ ते ३ महिने दर असेच चढे राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे.

नारळाच्या आकारानुसार आणि गुणवत्तेनुसार एका व वाहतूक निहाय वाढहोण्याची शक्यता आहे एकंदरीतच गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी असे मोठे सण एकामागून एक येत असल्याने पुढील २ ते ३ महिने नारळाचे दर तेजीतच राहतील, असा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे.

Coconut price hike
Vasai Virar redevelopment projects : वसई-विरारमधील ८० हून अधिक पुनर्विकास प्रकल्पांना ‘ब्रेक’

नवी मुंबईतील एपीएमसी घाऊक बाजारात दररोज दक्षिण भारतातील तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या राज्यांतून नारळाच्या आवक होत असते. मात्र, सणांमुळे स्थानिक पातळीसह सर्वच राज्यांमध्ये नारळाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. विशेषत: गणपतीचा सण अवघ्या 4 दिवसांवर आला आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा सुद्धा होत असल्याने आणि वाहतूक खर्चात वाढ झाल्याने दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

सद्यस्थितीतील दर (किरकोळ बाजार)

  • लहान नारळ: 25 ते 35 रुपये प्रति नग

  • मध्यम नारळ: 40 ते 45 रुपये प्रति नग

  • मोठा नारळ: 50 ते 55 रुपये प्रति नग

  • तसेच (घाऊक बाजार अंदाज)नवा नारळ: २,५०० ते २,८०० रुपये शेकडा

  • पालकोल नारळ: २,७०० ते २,८०० रुपये शेकडा

  • मद्रास नारळ: ४,३०० ते ४,५०० रुपये शेकडा

  • वाशी व पुणे मार्केटमधून नारळ भरती ही ९० भरती मोठा नारळ,१२५,१५० १८० भरती व सर्वात लहान नारळ २२० भरतीचा अशा स्वरूपात विक्रीसाठी लहान गावात आणला जातो. तर रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी कोलथरे ,गुहागर येथील गणपती सणासुदीला फक्त नारळ मोजक्या शहरात विक्रीसाठी आणला जात आहे त्याचे दर वेगवेगळे असले तरी मोठा नारळ सरासरी ५० रुपये आहे मात्र या ठिकाणच्या नारळ थेट विक्रेते स्वतः च्या वाहनाने घेऊन जात असतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news