

कोकणातील शुभ सकाळ ही पक्षांच्या किलबिलाटाने होत असते. सकाळच्या वेळी डोंगर-कपारीत आणि खाड्यांवर ऐकू येणारा किलबिलाट निसर्गाच्या सुरेलतेला उजाळा देतो. पर्यटनातील महत्त्वकोकणात आलेल्या पर्यटकांसाठी पक्षीनिरीक्षण हा एक आगळावेगळा अनुभव ठरतो. कोकण हा निसर्गरम्य, डोंगररांगा, समुद्रकिनारे आणि हिरवाईने नटलेला आहे. या निसर्गसंपन्न वातावरणामुळे येथे पक्ष्यांचे अप्रतिम जग खुलून दिसते. निळ्याशार समुद्र, हिरवीगार डोंगररांगा, खाड्या आणि जलाशय यामुळे कोकणातील पर्यावरण अतिशय समृद्ध झाले आहे. याच कारणांमुळे दरवर्षी अनेक परदेशी पक्षी, हजारो किलोमीटरचा प्रवास करून, कोकणात येतात.
ऋषितातावडे, अलिबाग
कोकणात आता पक्षीनिरीक्षण हा छंद दिवसेंदिवस लोकप्रिय होत असून त्याचा कोकणातील पर्यटनावर सकारात्मक परिणाम दिसून येतो. पनवेलचे वडाळे तलाव, कर्णाळा अभयारण्य, मुरुडचे फणसाड अभयारण्य, गणपतीपुळे, आरे-वेरे किनारा, रत्नागिरी व सिंधुदुर्गातील खाड्या, तळेरे, वेलस, भाट्ये, चिपळूण व सावंतवाडी परिसर ही ठिकाणे पक्षीनिरीक्षणासाठी विशेष गाजत आहेत. निसर्गाशी जवळीक साधण्यासाठी अनेक पर्यटक या भागांत दाखल होत असल्याने स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळत आहे. कोकणातील हॉटेल्स, होमस्टे, मार्गदर्शक आणि स्थानिक व्यवसायांना या पर्यटनाचा मोठा फायदा होत आहे.कोकणातील पक्ष्यांचा हा बहर केवळ निसर्गाचा आनंद देणारा नाही, तर पर्यावरण संवर्धन व स्थानिक उपजीविकेलाही महत्त्वपूर्ण हातभार लावणारा ठरत आहे.
जवळपास कोकणात येणाऱ्या पक्ष्यांची संख्या चारशेच्या घरात आहे. यातील साठ टक्केपक्षी हे स्थलांतरी आहेत. या भागामध्ये विनीच्या हंगामात येणाऱ्या पक्षांची संख्या मोठी आहे. प्रामुख्याने कोकणात नवीमुंबई भागामध्ये येणारे फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणात येथे दाखल होतात. त्याच्या आगमनाने लाला तांबुस रंगाने तिथला रंग खुलून जातो. स्थलांतर हा मानवी संस्कृती आणि स्थित्यंतर या विषयी अर्थभुत देणारा ‘शब्द’ आहे. जीवन-मृत्यूच्या अनेक आव्हानांना तोंड देत पक्षांचे स्थित्यंतर बरेच काही सांगुन जाते. धृवीय प्रदेश, उत्तरखंडींत देश हिवाळ्यात बर्फाच्छादित होतात. पक्षी उष्ण कंठीय प्रदेशात स्थलांतरी होतात. अन्नचा तुटवढा पडल्यामुळे पक्षी उष्णकंठीय प्रदेशात स्थलांतरित होतात. यामधील फ्लेमिंगो हा महत्त्वाचा पक्षी आहे. हिवाळ्यात स्थलांतरित पक्ष्यांमध्ये फ्लेमिंगो, खंड्या आणि ब्लॅकवॉटर, बगळे, बदकं, करकोचे, किंगफिशर, सुतारपक्षी फ्लाय-कॅचर, वॉर्बलर, ब्लू-थ्रोट, रॉबिन, ड्रॉन्गो, यांची उपस्थिती पर्यटकांना आकर्षित करते. याशिवाय ब्राम्हनी डक, युरेशीयन टॉट्स, शेराटी, शेकाटी, हे बलुचिस्थानातून येत असतात. पक्षांच्या आमगना बरोबर किनारपट्टीचे वाातावरण बदलुन जाते आणि पर्यटनालाही बहर येतो.
उत्तरधृवीय बर्फाळ प्रदशातून येणाऱ्या पक्ष्यांमध्ये शार्क, शेराटी, शेकाटी, फ्लेमिंगो, पेट्रेलर्स, ग्रेटर्स, हुबीश, ब्ल्युटेल्स असे अनेक जातीचे पक्षी हे थंड कटिबंधातून उष्ण कटिबंधाकडे येतात. आर्टिक्टॉर, स्टन टोल्स, नॉटीज हे समुद्र पक्षी प्रामुख्याने येत असल्याने पक्षांची वैविध्यता लक्षात घेऊ न अनेक पक्षीमित्रही पक्ष्यांच्या अभ्यासाठी येतात. सलीम अली पक्षी अभ्यास केंद्रही अलिबाग येथील किहिम येथे उभारलेले जात आहे. हे पक्षी मित्रांसाठी प्रमुख केंद्र ठरणार आहे. कासव संरक्षणही याभागात राबवले जातात. या पर्यावरणपुरक उपक्रमामुळे पर्यटनाला नवी दिशा मिळू लागली आहे.
हे दृश्य केवळ मनोहारी नसून पर्यावरणदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे असल्याने मुंबई, पुणे, ठाणे, अनेक जिल्ह्यातील पर्यटक या निसर्गाचा आनंतद घ्यायला येत असतात. स्थलांतरित पक्ष्यांसोबतच अनेक स्थानिक पक्षीही कोकणात पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. दरवर्षी हिवाळ्यात सायबेरिया, युरोप, आफ्रिका आदी देशांमधून हजारो स्थलांतरित पक्षी कोकणात दाखल होतात. खाड्या आणि बॅकवॉटर परिसर हे या पक्ष्यांचे आवडते थांबे ठरतात.
रायगड जिल्ह्यातील उरण परिसरातील खाडी किनारी दरवर्षी उन्हाळ्यात सायबेरियातून येणाऱ्या फ्लेमिंगो पक्षांचे थवे दिसतात. परंतु, गेल्या एक-दोन वर्षांत पक्षी अभ्यासकांनी एक वेगळेच निरीक्षण नोंदवले आहे. या पैकी काही फ्लेमिंगो आता पावसाळ्यातही येथे मुक्कामी राहू लागले आहेत. हे दृश्य केवळ निसर्गाच्या वैशिष्ट्यपूर्ण चक्राचे दर्शन घडवत नाही, तर पर्यावरणातील बदल आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या जीवनशैलीबाबत अभ्यासासाठी नवी दिशा देखील देते. पनवेलमधील वडाळे परिसरात अनेक स्थानिक व स्थलांतरित पक्षी पाहायला मिळतात. कावळे, मैना, पपई, कोकीळ, गरुड, घार, मोर यांसारखे स्थानिक पक्षी तर हिवाळ्यात स्थलांतरित पक्ष्यांमध्ये फ्लेमिंगो, बगळे, बदकं, करकोचे, किंगफिशर, सुतारपक्षी यांची उपस्थिती पर्यटकांना आकर्षित करते. पर्यटनाची संधीमुंबईजवळ असल्यामुळे पनवेलमधील पक्षीनिरीक्षण हे एक वेगळे पर्यटन ठरू शकते. पर्यटक एका दिवसाच्या सहलीत निसर्गसंपन्न पक्षीविश्व अनुभवतात. मुंबईपासून अवघ्या 60 किलोमीटरवर असलेले हे कर्णाळा अभयारण्य शहराच्या गोंगाटापासून दूर, हिरवाईने नटलेल्या सह्याद्रीच्या कुशीत आहे. पक्ष्यांचे वैभवकर्णाळा अभयारण्यात तब्बल 200 हून अधिक पक्ष्यांच्या जाती आढळतात. यामध्ये कोकीळ, पपई, बुलबुल, किंगफिशर, सुतारपक्षी, मैना, मोर यांसारखे स्थानिक पक्षी तर हिवाळ्यात येणारे स्थलांतरित पक्षी जसे की फ्लाय-कॅचर, वॉर्बलर, ब्लू-थ्रोट, रॉबिन, ड्रॉन्गो, तसेच विविध जलपक्षी यांचा समावेश होतो. ‘मालाबार ग्रे हॉर्नबिल’ व ‘अशा दुर्मिळ पक्ष्यांमुळे’ हे अभयारण्य पक्षीनिरीक्षणाच्या दृष्टीने अधिक प्रसिद्ध आहे. पर्यटनाचे आकर्षणकर्णाळा अभयारण्यात उंचसखल डोंगर, दाट जंगल आणि मधोमध असलेला कर्णाळा किल्ला ही पर्यटकांसाठी आणखी एक विशेष गोष्ट आहे. सकाळच्या वेळी किलबिलाट करणारे पक्षी, दाट जंगलातील पायवाटा आणि शुद्ध हवा यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना एक अविस्मरणीय अनुभव मिळतो.
परदेशी पक्ष्यांचे कोकणात आगमन हे निसर्गाचे एक अद्वितीय चमत्कार आहे. आपण या पक्ष्यांचे स्वागत करावे, त्यांचे संरक्षण करावे आणि निसर्गाचा सन्मान राखावा. कारण निसर्ग आणि मानव यांचे नाते हे सौंदर्य, शांती आणि सहअस्तित्व यावरच टिकून आहे. स्थलांतरित पक्षांच्या किलबिलाटाने आणि रंगीबेरंगी पिसाऱ्यांनी वातावरण मंत्रमुग्ध होते. कोकणातील निसर्गसंपन्न परिसर, नद्या, खाड्या आणि शांत सागरकिनारे हे वर्षभर पर्यटकांना भुरळ घालतात. सकाळच्या गार वाऱ्यात पक्ष्यांचे निरीक्षण करणे हा एक वेगळाच अनुभव ठरतो. त्यामुळे पर्यटनाला अधिक आकर्षण मिळते.
पर्यावरण संवर्धन आणि पर्यटनाचा समतोलपर्यटन आणि पर्यावरण यामध्ये समतोल राखणे गरजेचे आहे. पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास जपणे, प्लास्टिकमुक्त पर्यटन करणे आणि झाडांचे संवर्धन करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. यामुळे कोकणातील पक्ष्यांचे सौंदर्य आणि पर्यटन दोन्ही टिकून राहील.