Kharpada toll plaza: खारपाडा टोलनाक्यावर राडा; कर्मचारी आणि मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांमध्ये हाणामारी; ट्रॅव्हल्स बसची तोडफोड

लाठी-काठ्या आणि खुर्च्यांनी मारहाण केल्याची माहिती; ट्रॅव्हल्स बसची तोडफोड, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
Kharpada toll plaza
Kharpada toll plazaPudhari
Published on: 
Updated on: 

पनवेल: मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खारपाडा टोलनाक्यावर रविवारी रात्री टोल भरण्यावरून झालेल्या वादाचा सामना करावा लागला. टोल नाक्यावरील कर्मचारी आणि ट्रॅव्हल्स बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली.

या वेळी लाठी-काठ्यांसह लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगितले जात असून, संबंधित ट्रॅव्हल्स बसची तोडफोड केल्याचीही माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टोल भरण्यावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. ‘आम्ही टोल भरणार नाही, टोल कसला?’ या कारणावरून प्रवासी आणि टोल कर्मचारी यांच्यात वाद सुरू झाला.

Kharpada toll plaza
Taloja firing incident: तळोजात लिफ्ट कंत्राटावरून गोळीबार; दोघे गंभीर

या वादातून दोन्ही गटांमध्ये प्रथम धक्काबुक्की झाली आणि पुढे जावून त्यांचे रुपांतर मारामारीत झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या घटनेमुळे टोलनाक्यावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या हाणामारीच्या प्रकारामुळे मुंबईहून गोव्याकडे आणि गोव्याकडून मुंबईस जाणाऱ्या दोन्ही मार्गीकेवर मोठी वाहतूक कोंडी देखील झाली होती.

Kharpada toll plaza
Farmers Loan Waiver: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना 5,000 रुपये मिळणार; मुख्यमंत्र्यांचे आदेश, कर्जमाफीच्या चौथ्या यादीबाबत मोठी अपडेट

मुंबईकडे प्रवास करणारी खाजगी ट्रॅव्हल्स खारपाडा टोल नाक्यावर आली, या वेळी आम्ही टोल भरणार नाही टोल कसला यावरून कर्मचारी आणि बस मधील प्रवाशांनामध्ये बाचाबाची झाली, आणि इथेच भांडणाची ठिणगी पडली आणि थेट लाठी काठी, खुर्चीने मारहाण करण्यात आली.

बघता बघता तुफान राडा सुरू आला त्या मुळे काही काळ टोल नाका जाम झाला. हाणामारीची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटना स्थळी पोचून वाद मिटविला. आणि वाहतूक पूर्ववत सूरु झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news