Indapur Holi Traffic Jam: होळीपूर्वी इंदापूरमध्ये वाहतूक कोंडीची शक्यता; मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेले काम कारणीभूत

28 फेब्रुवारीपासून वाहनांची वाढती गर्दी; शिमगोत्सवासाठी कोकणाकडे निघणाऱ्या चाकरमान्यांमुळे प्रशासनासमोर आव्हान
Traffic jam between Mumbai-Goa highway
Traffic Jam : मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड ते इंदापूर दरम्यान वाहतूक कोंडीFile Photo
Published on
Updated on

इंदापूर : यंदा 2 मार्चला होळी सण साजरा होत असून कोकणातील शिमगोत्सवासाठी मुंबई, पुणे, ठाणे तसेच गुजरात मधील सुरत येथून मोठ्या प्रमाणात चाकरमानी आपल्या गावी रवाना होणार आहेत. त्यामुळे 28 फेब्रुवारीपासूनच इंदापूर बाजारात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Traffic jam between Mumbai-Goa highway
Mahad City Police: महाड शहर पोलीस ठाण्याच्या घडामोडींना पूर्णविराम; संदीप भोसले यांनी स्वीकारला कार्यभार

कोकणात जाणाऱ्या वाहनांचा मुख्य मार्ग असलेला मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वर सध्या विविध ठिकाणी अपूर्ण कामामुळे, काही ठिकाणी रस्ता अरुंद यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. परिणामी मुंबईहून चार पदरी मार्गाने येणारी वाहने इंदापूर बायपास जवळ एकेरी मार्गावर येतात. मोठी कोंडी निर्माण होते. शनिवार - रविवार सुट्ट्या त्यानंतर होळीची सलग सुट्टी यामुळे 28 फेब्रुवारीपासूनच खाजगीकार, प्रवासीबस, ट्रॅव्हल्स, दुचाकी तसेच जड वाहनांची संख्या वाढणार आहे. गेल्या 26 जानेवारीच्या वेळीही 3 ते 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले होते. आत्ताही अशीच परिस्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Traffic jam between Mumbai-Goa highway
Murud Janjira Holi Festival: मुरुड किनाऱ्यावर होळीचा जल्लोष; सजलेल्या बोटींचा आगळावेगळा सोहळा

इंदापूर आठवडा बाजार शुक्रवार व लागून शनिवार - रविवार व होळीची सुट्टी यामुळे इंदापूरचे व्यापारी नागरिक व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. दुकानदारांना माल पोहोचविण्यात अडथळे निर्माण होतात. तर रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांनाही विलंब होतो. वाहतूक कोंडीच्या वेळी काही वाहन चालकांकडून बेशिस्त ओव्हर टेक, रस्त्याच्या कडेला पार्किंग, उलट दिशेने वाहन घालणे असे प्रकार घडतात. त्यामुळे कोंडी अधिकच वाढते.

होळी हा आनंदाचा सण असला तरी दरवर्षी होणारी वाहतूक कोंडी इंदापूरकरांना डोकेदुखी ठरते. यंदा 28 फेब्रुवारीपासूनच प्रशासनाने दक्षता नाही घेतली तर 2 मार्चच्या होळीपर्यंत परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.

Traffic jam between Mumbai-Goa highway
Poladpur Crime: आंबेनळी घाटात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, CCTV फुटेजच्या आधारे तपास सुरू

सणासुदीच्या काळातील ही वाहतूक कोंडी कधी संपणार ? रखडलेला मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 च्या कामाला गती देऊन आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करूनच या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो अशी सर्व सामान्यांची व पर्यटकांची अपेक्षा आहे.

Traffic jam between Mumbai-Goa highway
RTE Admission : आरटीईअंतर्गत 269 शाळांचा समावेश

पोलीस बंदोबस्त वाढवा

नियमभंग करणाऱ्या वाहनचालकावर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दंडात्मक कारवाई तसेच पोलीस बंदोबस्त वाढविणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news