Mahad City Police: महाड शहर पोलीस ठाण्याच्या घडामोडींना पूर्णविराम; संदीप भोसले यांनी स्वीकारला कार्यभार

रमेश तडवी यांची ग्रामीण ठाण्यात बदली; कायदा-सुव्यवस्था राखण्यास प्राधान्य देणार असल्याची नव्या निरीक्षकांची ग्वाही
Mahad City Police
Mahad City PolicePudhari
Published on
Updated on

महाड : आपल्या बदलीबाबत नाराजी व्यक्त करत वरिष्ठांच्या कथित जातीवाचक छळाला कंटाळून पोलीस महासंचालकांना पत्राद्वारे आत्महत्येचा इशारा देणारे महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांची अखेर ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नुकताच संदीप अशोक भोसले यांनी महाड शहर पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारला असून काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावपूर्ण घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

Mahad City Police
BMC Education Budget: महापालिकेचा 4,248 कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प; ‘मिशन सफल’द्वारे व्हिजन 2027ला गती

नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक संदीप भोसले हे मूळ सातारा जिल्ह्यातील असून त्यांनी तेथेच त्यांनी आपले संपूर्ण शिक्षण पूर्ण केले आहे. घरातील कोणतीही पोलीस पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर पोलीस दलात आपला ठसा उमटवला आहे.

Mahad City Police
Mumbai Fire Brigade Budget: मुंबईत अग्निशमन दलाला मोठी बळकटी; अर्थसंकल्पात 119 कोटींची वाढ

भोसले यांना सुमारे 20 वर्षांचा पोलीस सेवेचा अनुभव आहे.

गडचिरोली या नक्षल प्रभावित भागात त्यांनी दीड वर्ष काम केले आहे. त्यानंतर पुणे ग्रामीण, नाशिक, नंदुरबार, नागपूर, सिंधुदुर्ग तसेच रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. 2017 पासून ते पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असून सलग दहा वर्ष उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल त्यांना 26 जानेवारी 2025 रोजी पोलीस संचालक पदकाने सन्मानित करण्यात आले होते.

Mahad City Police
Maharashtra Government HR Reform: राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवा प्रक्रिया ‘ऑटोपायलट मोड’वर; एचआर सुधारणांची मोठी घोषणा

महाड शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, आगामी शिवजयंती, होळी, चवदारतळे सत्याग्रह दिन तसेच इतर सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी धार्मिक व जातीय सलोखा राखून प्रशासनाला सहकार्य करावे.

संदीप भोसले, पोलीस निरीक्षक, महाड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news