

रायगड : मौजे बागमांडला, श्रीवर्धन येथे फेरीबोटीच्या नवीन जेट्टीच्या एका बाजूला चिखलांवर ग्रीनसीटर्टल कासव एक मोठं कासव वाहून आले असून,ते नर जातीचे आहे.अशाप्रकारे प्रथमच नर कासव आल आहे.
वेळास येथील आकाश सुरेश पाडलेकर यांना कासव किनाऱ्यावर आढळले.त्यांनी याबाबतची माहिती देताच कांदळवन विभाग दक्षिण कोकण यांचे अधिनस्त वनरक्षक, कासव तज्ञ, कासव मित्र यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता ते ग्रीन सीटर्टल या प्रजातीचे नरकासव आहे असे लक्षात आले.
जिल्ह्यात सागरी क्षेत्रात सागरी कासवांच्या पाच प्रजाती आढळतात त्या अनुषंगाने या प्रजातीचा त्यात समावेश आहे परंतु आज बागमांडला, येथे प्रथमच नर ग्रीन सी कासव वाहून आल्याचे कांदळवन प्रतिष्ठानचे सहाय्यक संशोधक मोहन उपाध्ये यांच्या निदर्शनास आले पाण्याला ओहोटी लागल्यामुळे ते किनाऱ्यावर वाहून आले असावे. मारळ येथील जयंत कानडे, संकेत मयेकर व हरिहरेश्वर येथील संतोष मयेकर, सुबोध खोपटकर कासव मित्र आणि कांदळवन विभागाचे वनरक्षक तुषार बाप्पासाहेब भटे व ऋषिकेश विश्वास लव्हटे तसेच कासव तज्ञ मोहन उपाध्ये तसेच तेथील काही स्थानिक ग्रामस्थ आणि फेरी बोटीवर काम करणाऱ्या मुलांच्या साहाय्याने त्या कासवाला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. अशाप्रकारे समुद्री कासव आढळल्यास त्वरीत कांदळवन विभागास कळविण्यात यावे, असे आवाहन विभागीय वन अधिकारी कांदळवन विभाग, दक्षिण कोकण कांचन पवार यांनी केले आहे.
हे ग्रीन सीटर्टल अंदाजे 200 किलो वजनाचे आहे. त्याची लांबी (डोकं ते शेपटी ) 190 सेंमी, (6 फूट 3 इंच) पाठीची लांबी 65 सेंमी, (2.11 फुट) रुंदी 62.5सेंमी, (2 फुट) शेपटी 36 सेंमी आहे. अशा प्रकारचे नर ग्रीनसीटर्टल कासव पहिल्यांदाच रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीला लागल्याचे कळले आहे. यापूर्वी आसपासच्या किनाऱ्यावर किंवा खाडीत ग्रीन सीटर्टलच्या माद्या आढळल्या आहेत.
रायगड : बागमांडला, श्रीवर्धन येथे फेरीबोटीच्या जेट्टीच्या बाजूला चिखलावर ग्रीनसीटर्टल नर जातीचे कासव वाहून आले.