Eco Friendly Paper Ganesha: यंदा नेरूळ येथील कागदी गणेशमूर्तींना परदेशातूनही मोठी मागणी

आफ्रिकेतील काँगो येथे प्रजासत्ताकात गणेशमूर्तींचे आगमन; पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जय्यत तयारी
Eco Friendly Paper Ganesha
Eco Friendly Paper GaneshaPudhari
Published on
Updated on

खांदा कॉलनी: पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या कागदी गणेशमूर्तींना यंदा परदेशातूनही मोठी मागणी मिळाली असून, मध्य आफ्रिकेतील रिपब्लिक ऑफ काँगो येथे गणेशोत्सवासाठी नेरूळ येथील मूर्तिकार एम. पी. पवार यांनी साकारलेल्या कागदी श्रीगणेश मूर्ती रवाना झाल्या आहेत.

गेली अनेक वर्षे एम. पी. पवार पर्यावरणपूरक कागदी गणेशमूर्ती तयार करत असून त्यांच्या मूर्ती भारतासह विविध परदेशी देशांमध्येही पोहोचत आहेत.

Eco Friendly Paper Ganesha
Matheran Neral Ghat Car Accident: माथेरान घाटात कारचा भीषण अपघात; दोन जखमी

यंदा आफ्रिकेतील गणेशभक्तांसाठी विशेषतः ६ फूट उंचीची सुमारे २० किलो वजनाची (लाकडी फळीसह) तसेच ५ फूट उंचीची सुमारे १५ ते १८ किलो वजनाची कागदी गणेशमूर्ती तयार करण्यात आली आहे.

हवामान बदल, वाढते प्रदूषण आणि निसर्गावर होणारे परिणाम लक्षात घेता पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर जगभर भर दिला जात आहे. निसर्गावर होणारा वाढता ताण आता विविध नैसर्गिक आपत्तींच्या माध्यमातून जाणवत असल्याने पर्यावरणाचे संरक्षण ही काळाची गरज बनली आहे.

परदेशातील गणेशभक्त पर्यावरण जपण्यासाठी कागदी गणेशमूर्तींचा स्वीकार करत असताना, भारतातील नागरिकांनीही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावे, असे आवाहन मूर्तिकार एम. पी. पवार यांनी केले आहे.

Eco Friendly Paper Ganesha
NAINA Development: नैना क्षेत्रासाठी सरकारचे दमदार पाऊल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून टाऊन प्लॅनिंगला गती

त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या कलाकौशल्यासह पर्यावरण संवर्धनाचा संदेश सातासमुद्रापार पोहोचत असल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

संवर्धनाचा संदेश सातासमुद्रापार

परदेशातील गणेशभक्त पर्यावरण जपण्यासाठी कागदी गणेशमूर्तींचा स्वीकार करत असताना, भारतातील नागरिकांनीही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावे, असे आवाहन मूर्तिकार एम. पी. पवार यांनी केले आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या कलाकौशल्यासह पर्यावरण संवर्धनाचा संदेश सातासमुद्रापार पोहोचत असल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news