Matheran Neral Ghat Car Accident: माथेरान घाटात कारचा भीषण अपघात; दोन जखमी

चालकाविरोधात नेरळ पोलिसांत गुन्हा दाखल
Matheran Neral Ghat Car Accident
Matheran Neral Ghat Car AccidentPudhari
Published on
Updated on

नेरळ: माथेरान-नेरळ घाटमार्गावरील जुम्मापट्टी येथील एस पॉईंट परिसरात सोमवारी २७ जुलै दुपारी सुमारे २. ५७ वाजण्याच्या सुमारास झालेल्या कार अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले आहे. वाहनाचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी नेरळ पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगर येथील रहिवासी असलेला चालक त्याच्या ताब्यातील होंडा ऑरा ही कार माथेरानच्या दिशेने नेरळकडे माथेरान घाट रस्त्यावरून जात असताना, नेरळ जुम्मापट्टी येथील एस पॉईंट जवळील घाटातील उतारावरील वळणावर आल्यानंतर चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालविल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला.

Matheran Neral Ghat Car Accident
NAINA Development: नैना क्षेत्रासाठी सरकारचे दमदार पाऊल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून टाऊन प्लॅनिंगला गती

त्यानंतर कार रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या सिमेंटच्या डिव्हायडरवर आदळून अपघात झाल्याची घटना घडली असल्याचे समोर आले आहे. या अपघातात कारमधील दोन प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून वाहनाचेही नुकसान झाले आहे.

Matheran Neral Ghat Car Accident
HSRP Number Plate: रायगडमध्ये एचएसआरपी नंबरप्लेट बसविण्याकडे दुर्लक्ष; ३३० वाहनचालकांवर कारवाई

या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हा नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक साळुंखे हे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news