

महाड; पुढारी वृत्तसेवा : महाड औद्योगिक वसाहतमधील प्रदीप शेटे केमिकल कंपनीला आज (दि.७) सायंकाळी साडेसातच्या सुमारास भीषण आग लागली. एमआयडीसी फायर स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या तातडीच्या उपायोजनांनी तसेच लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या फायर फायटरने केलेल्या सहकार्यामुळे काही तासानंतर या आगेवर नियत्रण मिळवणे शक्य झाले आहे. केमिकल कंपनीतील रासायनिक ड्रम व स्फोटाच्या आवाजामुळे एमआयडीसी परिसर हादरून गेला आहे.
काही महिन्यांपूर्वीच एडिशनल एमआयडीसीमध्ये झालेल्या ब्ल्यूजेट कंपनीच्या घटनेतून महाड एमआयडीसी सावरत असतानाच या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे पुन्हा एकदा औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. महाड औद्योगिक वसाहतमधील आगीच्या घटनांकडे शासनाने गंभीरपणे लक्ष देऊन कार्यवाही करावी, अशी मागणी कामगार वर्गासह शेजारील गावातील ग्रामस्थांकडून केली जात आहे.
हेही वाचा :