बेळगाव: पुढारी वृत्तसेवा : मित्राच्या घराचा स्लॅब टाकताना बंद पडलेली मोटर दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या कल्लाप्पा हणमण्णावर (वय ४७) यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज (दि. ७) सकाळी १०.३० च्या सुमारास बसवण कुडची येथे घडली.
कल्लाप्पा हणमण्णावर हे १९९८ पासून हेस्कॉमच्या सेक्शन ३ सबरीजन १ येथे मीटर रीडर म्हणून सेवा बजावत होते. आपल्या मित्राच्या घरचा स्लॅब टाकताना बंद पडलेली मोटर दुरुस्ती करण्यासाठी गेलेल्या कल्लाप्पा हणमण्णावर यांना विजेचा धक्का बसल्याने ते विहिरीत पडले. विजेचा धक्का लागून विहिरीत पडल्यानंतर पाण्याच्या संपर्कात आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा