Gautami Patil: गौतमी पाटील आली अन् आयोजकांवर गुन्हा दाखल

Gautami Patil: गौतमी पाटील आली अन् आयोजकांवर गुन्हा दाखल


पनवेल: नृत्यांगणा गौतमी पाटील च्या कार्यक्रमाला परवानगी नसतानादेखील अवैध पद्धतीने जमाव गोळा केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल तालुक्यातील वावजे येथील एका वाढदिवसाच्या कार्यक्रमाला गौतमी पाटील सेलिब्रिटी म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमावर गुन्हा दाखल झाला आहे. (Gautami Patil)

नृत्यांगणा गौतमी पाटील आणि वाद हे समीकरण सध्या पाहायला मिळत आहे. नुकतेच नवी मुबाईतील कामोठे शहरात राष्ट्रवादीचे महाराष्ट्र् संघटक सचिव राजकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम काही तुरळक वाद सोडून शांततेत पार पडला होता. त्यामुळे या कार्यक्रमावर कोणताही गुन्हा कामोठे पोलिसांनी दाखल केला नाही. मात्र, हा कार्यक्रम झाल्यानंतर १२ ऑक्टोबररोजी पनवेल तालुका हद्दीतील वावजे गावात एका वाढदिवसानिमित्तने गौतमी पाटील हिला सेलेब्रिटी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमाला पनवेल तालुका पोलिसांनी परवानगी नाकारली होती, परवानगी नसताना देखील गौतमीला आणून अवैध पद्धतीने जमाव केल्या प्रकरणी या कार्यक्रमाचे आयोजक रमाकांत हरी चौरमेकर व अंकित वर्मा  यांच्यावर पनवेल तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. १३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Gautami Patil)

आयोजकासोबत सहारा रिसॉर्टचे मालक व व्यवस्थापक यांच्यावर देखील विना परवाना, बेकायदेशीर ध्वनीक्षेपकाचा वापर करुन ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश महाला पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news