रायगडमध्ये ३० भात खरेदी केंद्र सुरु होणार | पुढारी

रायगडमध्ये ३० भात खरेदी केंद्र सुरु होणार

अलिबाग; पुढारी वृत्तसेवा : मान्सूनच्या लहरीपणाला तोंड देत रायगड जिल्ह्यातील भातपिके आता तयार होत आहे. भात कापणीनंतर शेतकन्यांची खळी भाताच्या राशींनी भरणार आहेत. त्यामुळे याहीवर्षी महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनकडून भात खरेदीचे नियोजन करण्यात येत आहे. ३० भातखरेदी केंद्र सुरु होणार असून भाताला २ हजार १८३ रुपये हमीभाव जाहीर झाला आहे.

रायगड जिल्ह्यातील  भात हे मुख्य पीक आहे. पावसाळी आणि उन्हाळी या दोन हंगामामध्ये हे पीक घेतले जात. पावसाळी हंगामात सुमारे एक लाख हेक्टरवर भात पिकाची लागवड होते. पाऊस आणि हवामान अनुकुल राहिल्यास भातपिकाचे उत्पादन चांगले होते. मात्र जिल्ह्यात पावसाने नेहमीच खरिपातील भात पिकांना फटका दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाताचे उत्पादन कमी-जास्त होत असते. या जुलै महिन्यातील अतिवृष्टी आणि मान्सूनच्या शेवटच्या टप्प्यात झालेला पाऊस यामुळे यावर्षी भाताच्या उत्पादनात घट होण्याची यता आहे. या वर्षी सुमारे दोन ते सव्वादोन लाख मे. टन भाताचे उत्पादन घेण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या रायगड विभागाकडून भात खरेदीचे नियोजन करण्यात येत आहे. या वर्षी पणन विभागातर्फे जिल्यात ३० केंद्र असून भावाला २ हजार १८३ रुपये हमीभाव जाहीर झाला आहे. गतवर्षीपेक्षा १४३ रुपये जादा दर भात उत्पादक शेतकयांना मिळणार आहे. पुढील काही दिवसांत भात खरेदी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती रायगडच्या राज्य मार्केटिंग फेडरेशनकडून देण्यात आली आहे.

किमान आधारभूत किंमत खरेदी  योजनेंतर्गत सरकारने यंदा सर्वसाधारण दर्जाच्या भावाला ती बिटल २ हजार १८३ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. गतवर्षी भातासाठी २ हजार ४० रुपये भाव देण्यात आला होता. यंदा यात १४३ रुपयाने वाढ झाली आहे. ‘अ’ दर्जाच्या भाताच्या किमतीत साधारण २० चा फरक असणार आहे. तसेच यावर्षी राज्य शासनाकडून अतिरिक्त दिल्या जाणाऱ्या  बोनसची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. ज्यांना भाताची शासकीय केंद्रावर करायची आहे त्या खरेदी केंद्रावर आगाऊ ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. काही दिवसांमध्ये भात करण सुरूवात साठवणूक येईल जिल्ह्यात दरहेक्टरी १२ ते १५ टिल भाताचे पीक मिळत आहे.

दरवर्षीच्या आकडेवारीनुसार  ज्यावेळेला जिल्ह्यातील सर्व भातकापणी संपलेली असेल त्यावेळेला सरासरी  उत्पन्न जेमतेम २० पर्यंत जाते. लागवडीखालील क्षेत्राचे मोजमाप योग्य पद्धतीने झाल्यास हे सरासरी अधिक वाढू शकते असे रायगड जिल्हा कृषी अधीक्षक उज्जवला  बाखेले यांनी महटले आहे.

Back to top button