

जवळाबाजार, पुढारी वृत्तसेवा: हिंगोली जिल्ह्यातील जवळाबाजार, करंजाळा, गुंडा , कळंबा, बोरीसावंत या गावासह परिसरात मंगळवारी दुपारी विजेच्या कडकडाटात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. जवळपास २ ते ३ तास पडलेल्या पावसामुळे खरीप हंगामातील शेकडो एकर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. Hingoli Rain
मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. पण अचानक दुपारी विजेच्या कडकडाटात मुसळधार पाऊस सुरू झाला. ढगफुटीसदृश्य पावसामुळे सखल भागात पाणी साठले. तर खरीप हंगामातील पिकांना या पावसाचा मोठा फटका बसला. शेकडो एकरमधील पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहिले. त्यामुळे पिके कुजण्याची शक्यता आहे. हातातोडाला आलेली पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. Hingoli Rain
जवळाबाजार परिसरातील करंजाळा, बोरीसावंत, गुंडा, कळंबासह बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला. यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. तर शेकडो एकरातील पिके वाहून गेली. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गांतून होऊ लागली आहे.
हेही वाचा