रायगड: दाभिळ, हळदुळे येथे वादळी वाऱ्यामुळे घरांचे मोठे नुकसान | पुढारी

रायगड: दाभिळ, हळदुळे येथे वादळी वाऱ्यामुळे घरांचे मोठे नुकसान

पोलादपूर: पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील दाभिळ व हळदुळे येथे सोमवारी (दि.२९) सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यात ३७ घरांचे २ वाड्यांचे, अंगणवाडी, शाळा, समाज मंदिराचे नुकसान झाले. तर वादळी वाऱ्यात झाड कोसळले. सुदैवाने कुठेही जीवित हानी झाली नाही.

नुकसानीची माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल दळवी यांनी तहसील कार्यालयाला दिली. तलाठी यू. बी. गाडगीळ यांनी तत्काळ नुकसानीचा पंचनामा केला. हळदुळे येथील ८ घरे,१ वाडा तर दाभिळ येथे २९ घर, १ वाडा १ अंगणवाडी,१ शाळा व १ समाजमंदिराचे वादळी वाऱ्यात कौले व पत्रे उडून गेली आहेत.

तालुक्यातील दाभिळ गावात वादळी पावसात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक सभागृहाचे नुकसान झाले आहे. तर विठोबा तुकाराम मोरे , नामदेव गोविंद कदम, सदू हबाजी मोरे, शंकर नारायण जाधव, कृष्णा सेतू कदम, तुकाराम विठोबा दळवी यांच्या घराचे नुकसान झाले आहे.

तलाठी गाडगीळ यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी अनिल दळवी, पोलीस पाटील विमल मोरे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button