रायगड : महाडमध्ये गारांसह जोरदार पाऊस

महाड; पुढारी वृत्तसेवा : महाडमध्ये आज (दि.१६) गारांसह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. गेल्या चार दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. आज सुमारे अर्धा तास गारपिटीसह झालेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे भाव निर्माण झाले होते. शालेय विद्यार्थ्यांनीही याचा आनंद लुटला.
आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी तीन नंतर पावसाचे वातावरण निर्माण झाले. गारांसह झालेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे भाव निर्माण झाले. शालेय विद्यार्थ्यांनीही पावसाचा आनंद लुटला. गेल्या अनेक वर्षांनंतर महाडमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गारांसह पाऊस झाला. पावसामुळे हवेत गारवा जाणवत आहे.
हेही वाचा :
- मुंबई : दादरचा बाजार इको फ्रेंडली गुढ्यांनी फुलला
- कॉपीचे प्रकार न थांबल्यास राज्याचे वाटोळे होईल; सरकारने कडक भूमिका घ्यावी : अजित पवार संतापले
- उन्हाळ्यातील उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी हे घरगुती उपाय जरूर करा…