रायगड : वादळी वाऱ्याचा महाड परिसराला तडाखा; पाच तास विद्युत पुरवठा खंडीत | पुढारी

रायगड : वादळी वाऱ्याचा महाड परिसराला तडाखा; पाच तास विद्युत पुरवठा खंडीत

महाड; पुढारी वृत्तसेवा : जोरदार वाऱ्यामुळे महाड शहरासह परिसरातील अनेक गावांमध्ये आज (दि.१) तब्बल पाच तास विद्युत प्रवाह खंडीत झाला होता. सकाळी सहा वाजता खंडीत झालेला विद्युत पुरवठा दुपारी बारा नंतर पूर्ववत सुरू करण्यात आला.

आज सकाळी महाड परिसरात वेगाने वारे वाहण्यास सुरूवात झाली. वादळीवाऱ्यामुळे महाड शहर तसेच परिसरातील अनेक गावांमध्ये विद्युत प्रवाह खंडीत झाला होता. चांभार खिंड येथील उपकेंद्रामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाल्याची माहिती शहर अभियंता शिंदे यांनी दिली. दुपारी बारानंतर शहरासह तालुक्याच्या विविध भागातील बंद पडलेला पुरवठा पूर्ववत करण्यात आला.

हेही वाचा : 

Back to top button