रायगड : सुधागडमध्ये बाळासाहेबांची शिवसेना सरस ; १४ पैकी ५ ग्रामपंचायतींवर फडकविला झेंडा | पुढारी

रायगड : सुधागडमध्ये बाळासाहेबांची शिवसेना सरस ; १४ पैकी ५ ग्रामपंचायतींवर फडकविला झेंडा

पाली; पुढारी वृत्तसेवा :  सुधागड तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज (दि.20) जाहीर झाला. यामध्ये  सर्वाधिक 5 ग्रामपंचायतींवर बाळासाहेबांची शिवसेना गटाचे सरपंच निवडून आले आहेत. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे 1 खाते उघडले आहे. याबरोबर शेकाप 3, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1, भाजप 1,  शेकाप – राष्ट्रवादी आघाडी 1, शेकाप – उद्धव ठाकरे शिवसेना 1, आणि शेकाप – भाजपा युती 1 अशी खाती उघडली आहेत.

 तालुक्यातील सिद्धेश्वर, आपटवणे, माणगाव बुद्रुक, चंदरगाव, खांडपोली, हातोंड, चिवे, घोटवडे, ताडगाव, खवली, तिवरे, शिळोशी, अडुळसे, आतोणे या १४ ग्रामपंचायतची निवडणूक झाली आहे. यापैकी चिवे व खांडपोली ग्रामपंचायतवर बाळासाहेबांची शिवसेना गटाचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच सदस्यपदासाठी एकूण ११० जागा होत्या. यापैकी ५० सदस्य बिनविरोध निवड झालेले आहेत. तर उर्वरित ६० सदस्य पदासाठी निवडणूक झाली. यासाठी १२२ उमेदवार रिंगणात होते. तर १२ ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी एकूण 25 उमेदवार रिंगणात होते.

सदस्यपदासाठी वंचित बहुजन आघाडीच्या दोन उमेदवारांनी खाते उघडले आहे. माणगाव बुद्रुक व घोटवडे ग्रामपंचायत सदस्यपदी वंचित बहुजन आघाडीचे प्रत्येकी एक उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीत शेकापने तब्बल 3 वेगवेगळ्या पक्षांसोबत युती आणि आघाडी केली होती. पाली तहसील कार्यालयात सकाळी 9 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळपासूनच उमेदवार, विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तहसील कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या गटात एकच जल्लोष झाला.

 सुधागड 14 ग्रामपंचायत सरपंच निकाल

1) हातोंड- विजयी उमेदवार – वाघमारे रमेश कानू – 599 -पक्ष – बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट)
पराजित उमेदवार – हिरवा विष्णू धाऊ – 519
नोटा – 18

2) खवली- विजयी उमेदवार – सुधीर कृष्णा केदारी-922 – पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
पराजित उमेदवार – चिले राजेंद्र कृष्णा – 570
नोटा -17

3) तिवरे :- विजयी उमेदवार – दिनेश राम पवार – 925 – पक्ष – उध्दव ठाकरे शिवसेना
पराजित उमेदवार – उमटे किसन नारायण -555
नोटा – 20

4) शिळोशी-विजयी उमेदवार- गीता विश्वास भोय – 866 – पक्ष – भाजपा
पराजित उमेदवार – पवार माई सुरेश – 55
नोटा – 12

5 ) चंदरगाव-: विजयी उमेदवार – सखाराम पांडू मरकड – 325 – पक्ष – शेकाप
पराजित उमेदवार – मंगल्या वाली दोरे – 256
नोटा – 63

6 )आपटवणे – विजयी उमेदवार – बैकर अस्मिता नरेश – 538- पक्ष – शेकाप – राष्ट्रवादी युती
पराजित उमेदवार – वालगुडे रुपाली दिनेश – 414
नोटा – 23

7 )अडुळसे – विजयी उमेदवार- वारगुडे यमुना यशवंत -741 पक्ष – शेकाप
पराजित उमेदवार – हांबिर तुळसा पांडुरंग -432
नोटा – 12

8 ) आतोणे – विजयी उमेदवार – हीलम ठकी सिताराम – 387, पक्ष – शेकाप
पराजित उमेदवार – वाघमारे लक्ष्मी गणपत -334
नोटा – 30

9 ) माणगाव बु. – विजयी उमेदवार – साळुंके रमेश गणपत – 972 – शेकाप – उध्दव ठाकरे शिवसेना व वंचीत बहुजन आघाडी युती
पराजित उमेदवार – कांबळे अशोक शंकर -866
नोटा -50

10 ) घोटवडे – विजयी उमेदवार – झोरे पांडुरंग भगवान – 485 पक्ष – बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट)
पराजित उमेदवार – झोरे बाळू रामा -384
नोटा -30

11) ताडगाव – विजयी उमेदवार – साठे करुणा भिमचंद्र -347 पक्ष – बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट)
पराजित उमेदवार – धायगुडे रंजना तुळशीराम -210
नोटा -5

12)  सिध्देश्वर बु. – विजयी उमेदवार – पवार अशिका कैलास -712 पक्ष – शेकाप – भाजपा युती
पराजित उमेदवार – वाघमारे कामिनी कृष्णा -472
नोटा -33

13 ) चिवे- रोहिदास साजेकर – बिनविरोध, बाळासाहेबांची शिवसेना

14 ) खांडपोली:- मानसी निलेश पालांडे,बिनविरोध , बाळासाहेबांची शिवसेना

हेही वाचा  :

 

 

Back to top button