Jalgaon : पारोळा तालुक्यात ९ पैकी ७ ग्रामपंचायतींवर फडकला शिंदे गटाचा भगवा

पारोळा,www.pudhari.news
पारोळा,www.pudhari.news

पारोळा : तालुक्यातील एकूण ९ ग्रामपंचायतींच्या लोकनियुक्त सरपंचासह सदस्य पदासाठी निवडणूक प्रक्रियेचा अंतिम निकाल आज पार पडला. यात आमदार चिमणराव पाटील यांनी सर्वच ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी आवाहन केले होते. यात कराडी, सावखेडे होळ व सावखेडे मराठ या ग्रामपंचायतींनी आपली निवडणूक बिनविरोध केली.

पारोळा तालुक्यातील ९ पैकी ७ ग्रामपंचायतींवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा फडकला आहे. यात कराडी ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सरपंच पूनम मनोहर पाटील यांच्यासह ७ सदस्य, सावखेडे मराठ ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सरपंच गोपाल सुरेश पाटील यांच्या सह ६ सदस्य व सावखेडे होळ ग्रामपंचायतीवर हरसिंग नाना पाटील पुरस्कृत लोकनियुक्त सरपंच राजू मंगा ठाकरे, उपसरपंच सुरेखा रामचंद्र पाटील यांच्यासह ७ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर मेहू ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सरपंच जिजाबाई गणेश पाटील यांच्या सह ७ सदस्य, सावखेडे तुर्क ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सरपंच लक्ष्मीबाई दिलीप रामोशी यांच्यासह ३ सदस्य, कंकराज ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सरपंच आशाबाई राजाराम पाटील यांच्यासह ३ सदस्य व कन्हेरे ग्रामपंचायतीवर लोकनियुक्त सरपंच अनिता सुकदेव भिल यांचेसह ७ सदस्यांनी विजय संपादन केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news