रायगड : जामीन मिळाल्यानंतर जगदीश गायकवाड कर्जत पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

रायगड : जामीन मिळाल्यानंतर जगदीश गायकवाड कर्जत पोलिसांच्या ताब्यात

पनवेल :पुढारी वृत्तसेवा: वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर  यांच्यासह त्यांच्या कुटुंबाविषयी पनवेल महापालिकाचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी आक्षेपार्ह विधान केले. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कळंबोली पोलिसांनी आज (दि.३०) अटक केली. दरम्यान, गायकवाड यांना पनवेल न्यायालयात आज दुपारी हजर केले असता जमीन मंजूर झाला. दरम्यान त्यांना  कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गायकवाड यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यासाठी कर्जत पोलीस न्यायालायात गेले होते. यावेळी गायकवाड यांनी स्वतःच्या गाडीत बसून पळून जाण्याचा प्रयत्न केला. गाडीला रोखणाऱ्या पोलिसांच्या अंगावर त्यांने गाडी घालण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी गाडी थांबवून त्यांना अटक करून कर्जतकडे घेऊन गेले.

गायकवाड यांच्या विधानाचे राज्यभरात पडसाद उमटले होते. मुंबई, पनवेल, कर्जत, पुणे, नगर परिसरात कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून जगदीश गायकवाड यांचा निषेध केला. तसेच कळंबोली पोलीस ठाण्यावर मोठा मोर्चा काढून अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर गायकवाड यांच्याविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज सकाळी कळंबोली पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यांना जामीन मंजूर झाल्यानंतर कर्जत पोलिसांनी गायकवाड यांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button