NDTV : अदानींनी एनडीटीव्ही ताब्यात घेताच प्रणय रॉय, राधिका रॉय यांचा संचालक पदाचा राजीनामा | पुढारी

NDTV : अदानींनी एनडीटीव्ही ताब्यात घेताच प्रणय रॉय, राधिका रॉय यांचा संचालक पदाचा राजीनामा

पुढारी ऑनलाईन डेस्क : एनडीटीव्हीचे (NDTV) संस्थापक प्रणय रॉय आणि त्यांची पत्नी राधिका रॉय यांनी होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड (RRPRH) च्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. प्रणय रॉय आणि राधिका रॉय यांच्या राजीनाम्याची माहिती एनडीटीव्हीने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला दिली आहे. अदानी समूहाने नवी दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड (NDTV) च्या अधिग्रहणासाठी खुली ऑफर आणली असतानाच दोघांनी राजीनामा दिला आहे.

‘आरआरपीआरएच’ने प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांचे राजीनामे २९ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत स्वीकारले आहेत. अदानी समूहाने न्यूज मीडिया कंपनी नवी दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड (NDTV) च्या आरआरपीआर होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 99.5 टक्के हिस्सा विकत घेतला आहे.

कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ‘आरआरपीआरएच’ने सुदिप्ता भट्टाचार्य, संजय पुगलिया, सेंथी सिन्निया चेंगलवरायन यांची तत्काळ प्रभावाने बोर्डाचे नवीन संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला, विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड (व्हीसीपीएल) ने एनडीटीव्हीची प्रवर्तक कंपनी RRPR ची 99.5 टक्के हिस्सेदारी खरेदी केली होती. व्हीसीपीएल ही AMG Media Networks Limited ची उपकंपनी आहे. ज्यामध्ये 100 टक्के हिस्सा अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडकडे आहे.

NDTV : शेअर्स ‘व्हीसीपीएल’मध्ये हस्तांतरित केले

‘एनडीटीव्ही’च्या प्रवर्तक कंपनीच्या म्हणण्यानुसार, इक्विटी कॅपिटलपैकी 99.5 टक्के अदानी समूहाच्या मालकीच्या व्हीसीपीएल मध्ये हस्तांतरित केले आहे. या समभागांच्या हस्तांतरणासह, अदानी समूहाला ‘एनडीटीव्ही’मधील 29.18 टक्के हिस्सा मिळेल. दुसरीकडे अदानी समूहाने एनडीटीव्हीमधील आणखी 26 टक्के स्टेकसाठी बाजारात खुली ऑफर आणण्याची घोषणा केली होती. याअदानी समूहाने अतिरिक्त 26 टक्के स्टेकसाठी खुली ऑफर देखील दिली आहे. त्याची मुदत 5 डिसेंबरला संपणार आहे.

अदानी समूहाने ऑगस्टमध्येच विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडचे ​​अधिग्रहण करण्याची घोषणा केली होती. 2009 आणि 2010 मध्ये विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेडने ‘एनडीटीव्ही’च्या व्यवसाय प्रवर्तक ‘आरआरपीआर’ होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडला 403.85 कोटी रुपये कर्ज म्हणून दिले होते. त्या बदल्यात, ‘एनडीटीव्ही’मधील 29.18 टक्के भागभांडवल कर्जदाराकडून कोणत्याही वेळी घेण्याची तरतूद करण्यात आली होती. आता अदानी समूहाच्या कंपनीने अतिरिक्त 26 टक्के हिस्सा खरेदी करण्याची खुली ऑफर दिली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button