FIFA WC KISS: वर्ल्ड कपमध्ये रोमान्स! फुटबॉलपटूने सामना जिंकताच गर्लफ्रेंडला केले KISS! | पुढारी

FIFA WC KISS: वर्ल्ड कपमध्ये रोमान्स! फुटबॉलपटूने सामना जिंकताच गर्लफ्रेंडला केले KISS!

पुढारी ऑनलाईन डेस्क : FIFA WC KISS : इंग्लंडने मंगळवारी (दि. 29) रात्री उशिरा झालेल्या सामन्यात वेल्सचा 3-0 गोलफरकाने पराभव करत धुव्वा उडवला. या विजयानंतर इंग्लिश खेळाडूंनी एकच जल्लोष करत आपापल्या पार्टनरला गाठले आणि त्यांच्यासोबत आनंदोत्सव साजरा केला. या विजयोत्सवाच्या दृश्याने सर्वांचेच लक्ष वेधले.

कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेची साखळी फेरी अंतिम टप्प्यात आली आहे. 2 डिसेंबरला शेवटचा साखळी सामना होणार असून त्यानंतर लगेचच 3 डिसेंबरपासून राउंड ऑफ 16 फेरीचे सामने सुरू होतील. दरम्यान, मंगळवारी (दि. 29) रात्री उशिरा झालेल्या सामन्यात इंग्लंडने वेल्सचा 3-0 असा पराभव करत बाद फेरीत प्रवेश केला. त्यांचा पुढील सामना सेनेगलशी होणार आहे.

वेल्सला धूळ चारल्यानंतर इंग्लंडचे फुटबॉलपटूं प्रेक्षक गॅलरीत उपस्थित असणा-या त्यांच्या पार्टनर्ससोबत गेले. जॅक ग्रेएइश याने त्याची गर्लफ्रेंड साशा एटवुडला, तर बुकायो साकाने त्याची गर्लफ्रेंड तोलामीला मिठी मारली. गोलकीपर अॅरॉन रॅम्सडेलने तर त्याची पार्टनर जॉर्जिना इर्विनचे स्टँडमध्येच चुंबन घेतले. इंग्लंड संघातील इतर खेळाडूंनी सुद्धा आपल्या कुटुंबियांसोबत मस्ती केली. या विश्वचषकात इंग्लंडने आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत. इराण, वेल्स विरुद्ध विजय मिळला आहे. तर अमेरिकेविरुद्धचा सामना अनिर्णित राहिला आहे. ग्रुप बी मध्ये हा संघ 7 गुणांसह अव्वलस्थानी असून राऊंड ऑफ 16 मध्ये त्यांच्यासमोर सेनेगलचे आव्हान असेल. हा सामना 4 डिसेंबरला रात्री 12.30 वाजता खेळवला जाणार आहे. या गटात अमेरिकेने दुसरे स्थान पटकावले आहे. त्यांचा सामना आता नेदरलँड्सशी होणार आहे. तर इराण आणि वेल्स स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

असा झाला सामना

मार्कस रॅशफोर्डच्या दोन आणि फिल फोडेनच्या एका गोलच्या जोरावर इंग्लिश संघाने वेल्सवर 3-0 असा विजय मिळवला. रॅशफोर्डने 50व्या आणि 68व्या मिनिटाला तर तर फोडेनने 51व्या मिनिटाला गोलजाळे भेदले.

Back to top button