

रोहे (रायगड) : महादेव सरसंबे : रोह्याचे ग्रामदैवत श्री महावीर महाराजांचा पालखी उत्सव रोहेकरांना अध्यात्मिक पर्वणीच असते. पोलिस दलाची सशस्त्र सलामी पाहण्यासाठी व श्री धावीर महाराजांचे दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून व्यवसाय व कामानिमित्ताने बाहेर गेलेले रोहेकर व महाराष्ट्रातील श्री धावीर महाराजांचे तमाम भक्तगण रोह्यात येत असतात. त्या दिवशीची उत्सुकता रोहेकरांना लागलेली असते. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. ६) रोहेकर ग्रामस्थ, भक्तगण श्री धाविर महाराजाच्या मंदिरात सकाळी जमण्यास सुरुवात झाली. सकाळी ५.३० पासून पालखी सोहळ्याची लगबग सुरू झाली. सहा वाजण्याच्या सुमारास श्री धावीर महाराजांच्या आरतीचा घंटानाद झाला. सगळ्यांचे लक्ष श्री धाविर महाराजांना पोलीस दलाकडून दिल्या जाणाऱ्या सलामीकडे होते. रोहा शहरातील हजारो भक्तगण सलामीचा हा क्षण टिपण्यासाठी मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर जमले. नव्याने आलेल्या भक्तगणांना यांची आधिकची उत्सुकता लागली होती.
रोह्याचे ग्रामदैवत श्री धाविर महाराजांचे मंदिरात पालखी उत्सवाची पूर्वतयारी पूर्ण झाली होती. सकाळी सहाच्या सुमारास आरती झाल्यानंतर रायगड पोलीस दलाच्यावतीने रोहा पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी सशस्त्र सलामी दिली. श्री धाविर महाराजांना पोलिस दलाकडून दिलेली मानवंदना हजारो नेत्राने श्री धाविर महाराजांना दिलेली सलामीचे क्षण टिपले. श्री धावीर महाराज की जय या गजराने सारा मंदिर परीसर दुमदुमला. यावेळी उपस्थितांनी महाराजांच्या पालखीचे दर्शन घेत पालखी उत्सवाला सुरुवात केली.
पारंपरिक खालुबाजा, ढोल ताशा, नाशिक ढोलच्या गजरात पालखीची मिरवणुकीस सुरुवात झाली. हजारो भक्तगण पालखीसोबत या मिरवणुकीत सामील झाले. श्रीधाविर महाराजांचा एकच गजर मंदिर परिसरात घुमू लागला. फटाक्यांची आतषबाजी खालुबाजा यास अन्य वाद्याने संपूर्ण परिसरात दणदणून निघाले. सातच्या सुमारास श्री धावीर महाराजांची पालखी मंदिरातून शहराकडे मार्गस्थ झाली. कोरोना महामारीनंतर सण उत्सवावरील निर्बंध उठल्यामुळे यावर्षी नागरिकांत आणि भाविकात उत्साह दिसून आला.
पालखीचे स्वागत सुरुवातीलाच बौद्ध, रूखी व चर्मकार समाज बांधवांनी केले. मुस्लिम समाजाच्यावतीने वरचा मोहल्ला मस्जिदजवळ स्वागत करण्यात आले. बौद्ध बांधवांसह मुस्लिम बांधवांनी पालखीचे स्वागत केले. बाजारपेठेत जैन व गुजराती समाजाने पारंपरिक पद्धतीने पालखीचे स्वागत केले. पुढेही पालखी बाजारपेठ -राम मारुती चौक, रायकर पार्क, दमखडी मार्गाने रात्रभर धनगर आळी, अंधार आळी, मोरे आळी करीत ती दुसऱ्या दिवशी मंदिरात पोचणार आहे. या दरम्यान रोहा शहरात प्रत्येक आळीत व सोसायटींमधून रोहेकरांसह, तालुक्यासह महाराष्ट्रातून आलेल्या भक्तगणांनी श्रीधर महाराजांचे दर्शन घेतले.
या पालखी सोहळा निमित्ताने संपूर्ण रोहा शहर सजले होते. ठिकठिकाणी पताका, रांगोळ्या रंगरंगोटी, विद्युत रोषणाई पहावयास मिळत होते. आपल्या घराच्या दारासमोर काढलेल्या, रस्त्यारस्त्यावर काढलेल्या महिला भगिनींच्या रांगोळ्या मोठ्या प्रमाणात भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था, रिक्षा संघटना, टेम्पो संघटना या सर्व शहरातील विविध सामाजिक संस्थांनी अल्पोपहार, थंड पेय, चहा, बिस्किट यास अन्य खाद्यपदार्थ व पेय भाविकांसाठी ठेवण्यात आले होते.
या पालखी उत्सवानिमित्ताने खा. सुनील तटकरे, माजी पालकमंत्री आदिती तटकरे, आ. अनिकेत तटकरे, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, शिवसेना तालुकाप्रमुख समीर शेडगे, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. किरणकुमार सूर्यवंशी, तहसीलदार कविता जाधव, मुख्याधिकारी धीरज चव्हाण, ट्रस्ट अध्यक्ष ॲड. प्रशांत देशमुख, उत्सव समिती अध्यक्ष शैलेश कोळी, माजी नगराध्यक्ष लालता प्रसाद कुशवाह, ट्रस्टचे मकरंद बारटक्के, नितीन परब, समीर सकपाळ, प्रकाश पवार, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर, भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित घाग, अप्पा देशमुख, तालुका अध्यक्ष विनोद पाशिलकर, सौ. वरदा तटकरे, महेश सरदार, शहराध्यक्ष अमित उकडे, महेश कोलाटकर, महेंद्र गुजर, राजेंद्र जैन, महेंद्र दिवेकर, संदीप सरफळे, आदित्य कोंढाळकर, जालिंदर शेवाळे, सूर्यकांत कोलाटकर, निलेश शिर्के, चंद्रकांत पार्टे, भुपेंद्र धाटावकर, पप्पू सर्णेकर उपस्थित होते.
हा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री धाविर महाराज मंदिर ट्रस्ट, उत्सव समिती, रोहेकर ग्रामस्थ, श्री धाविर महाराज भक्तगण परिश्रम घेत आहेत.
हेही वाचा :