PM Modi : पंतप्रधानांनी साधला रायगडमधील २६ अनाथ बालकांशी संवाद | पुढारी

PM Modi : पंतप्रधानांनी साधला रायगडमधील २६ अनाथ बालकांशी संवाद

अलिबाग : पुढारी वृत्तसेवा : प्रधानमंत्री केअर फॉर चिल्ड्रन योजनेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी  दूर दृष्यप्रणालीद्वारे रायगड जिलह्यातील २६ अनाथ बालकांसोबत आज (दि.३०) थेट संवाद साधला. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहातून मोदी यांच्या बरोबर संवाद साधताना ही सर्व बालके हरखून गेली होती.

(PM Modi) यावेळी केंद्र सरकार पंचायत राज विभागाचे राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
केंद्र सरकार पंचायत राज विभागाचे राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते यावेळी जिल्ह्यातील २६ अनाथ बालकांना पंतप्रधान मोदी यांचे पत्र, पीएम केअर योजनेचे स्नेह प्रमाणपत्र, आयुष्यमान भारत विमा योजनेचे कार्ड, पोस्ट खात्याचे पासबुक अशा विविध लाभांचे वितरण करण्यात आले.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button