पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास गेलेल्या महिलेकडून पीआयने करून घेतला ओपन बॉडी मसाज ! | पुढारी

पोलीस स्टेशनला तक्रार देण्यास गेलेल्या महिलेकडून पीआयने करून घेतला ओपन बॉडी मसाज !

पाटणा ; पुढारी ऑनलाईन : भारतात बिहार पोलिस कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत असतात दरम्यान बिहारमधील एका पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामुळे सोशल मीडियावर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका होत आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाल्याने नितीश सरकारवर जनतेने नाराजी व्यक्त केली आहे. (Bihar Police)

बिहारच्या सहरसा येथील नौहट्टा पोलीस ठाण्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कॉन्स्टेबलने चक्क तक्रार घेऊन आलेल्या महिलेलाच मसाज करण्यास भाग पाडले. दरम्यान या व्हिडीओमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

व्हायरल व्हिडीओवर सोशल मीडियावर लोकांनी चांगलाच संताप व्यक्त केला. पियुष राय नावाच्या व्यक्तीने ट्विटरवर या व्हिडिओवर कमेंट करत म्हणाला दररोज जाणीव होते की गंगाजल हा सत्य घटनांवर आधारित चित्रपट आहे. राज्यात कायदा सुवव्यस्था बिघडूपर्यंत बिहार सरकार झोपेत असेल का? व्हिडिओ पाहून बिहारच्या मुख्यमंत्र्यांना लाज वाटत नसेल का? असा थेट सवाल नेटकऱ्यांनी सरकारला विचारला आहे.

Bihar Police : नेटकऱ्यांकडून संताप

दरम्यान अरविंद शुक्ला नावाचा युजर म्हणतो की, गंगाजलसारखी चित्रपटे सध्या भूतकाळ बनली आहेत. अतिशय लज्जास्पद आणि आक्षेपार्ह घटना पोलीस ठाण्यात घडत असेल तर सरकार काय करत आहे असा सवाल नेटकऱ्यांनी केला. वाह रे गुडशासन, ये तो दुशासन है अशाही प्रतिक्रीया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. बिहार पोलिसांना अजिबात लाज वाटत नाही का? अशा अधिकाऱ्यांमुळे लोकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास कमी होत आहे.

दरम्यान याप्रकरणी एसपींनी इन्स्पेक्टरला निलंबित केले आहे. दुसरीकडे, इन्स्पेक्टर शशी भूषण सिन्हा यांनी म्हणाले की, हा व्हिडिओ २ महिन्यांचा आहे. महिलेकडून मसाज करवून घेणे हा गुन्हा नाही, हा घरगुती विषय आहे हा त्यांच्या गावातील महिलेचा वैयक्तीक प्रश्न आहे असे ते म्हणाले.

Back to top button