ओमेनमध्ये हायजॅक केलेल्या जहाजावरून कल्याणच्या तरुणाची सुटका | पुढारी

ओमेनमध्ये हायजॅक केलेल्या जहाजावरून कल्याणच्या तरुणाची सुटका

कल्याण; पुढारी वृत्तसेवा : ओमेन येथील हौसी बंडखोरानी एक मालवाहू जहाजावर बंदी केले होते. या जहाजावर नोकरीस असलेल्या एका कल्याण येथील तरुणाची साडे तीन महिन्यानंतर सुटका करण्यात आली आहे. हा तरुण रमजान महिन्यात सही सलामत कल्याणच्या घरी पोहोचल्याने त्याच्या कुटुंबियांना आनंद झाला आहे. तर खऱ्या अर्थाने युवकाच्या घरी रमजान ईद साजरी झाली असल्याची भावना त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.

कल्याणच्या गोविंदवाडी परिसरात राहणारा मोहम्मद मुन्नवर हा आखाती देशातील एका खासगी शिपींग कंपनीच्या मालवाहू जहाजावर डेक केडर पदावर कार्यरत होता. ओमान आणि संयुक्त अरब अमीरात यांच्यासोबत संघर्ष आहे. या संघर्षात हौथी बंडखोरांनी खासगी शिपींग कंपनीचे मालवाहू जहाज बंदिवान केले. यामुळे या जहाजावर मुन्नवर कार्यरत असल्याने त्याची आई बेनजीर आणि बहिण अलीजा यांची चिंता वाढली होती.

मोहम्मद मुन्नवरचे काय होणार ? या चिंतेने त्यांना दिवसरात्र झोप नव्हती. मात्र, भारतीय दूतावासाशी संपर्क साधल्यावर बंदिवान करण्यात आलेल्या जहाजावरील मुन्नवरच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु झाले. मुन्नवर हा जहाजावरुन सूटून कल्याणच्या घरी सुखरुप परतला आहे. मुन्नवर याच्यासह त्याच्या आईने सुटकेसाठी केलेल्या सर्वाचे आणि सरकारचे आभार मानले आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button