सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या; गुन्हा दाखल

सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या; गुन्हा दाखल
Published on
Updated on

पुणे: पुढारी वृत्तसेवा: सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार 1 जून रोजी घडल्यानंतर आता याप्रकरणी आत्महत्येस जबाबदार ठरलेल्या पत्नीसह सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोहिनूर शिंदे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याची आई हिरू पांडू शिंदे (54, रा. दत्तनगर, पिंपरी सांडस, हवेली) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार बॉडीबाज तलाठी काळे ऊर्फ पवार, राजा तलाठी काळे,  सायबू शिंदे, ओमकार साबा काळे, शब्बीर भिकू काळे, साबा तलाठी काळे, पत्नी प्रयत्ना, सरोजा नागनाथ माने (सर्व रा. डांगे चौक, पुणे) आणि योगेश बसवंत कार्लेकर (रा. गणेशनगर, नगर रोड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कोहिनूर याचे पहिले लग्न झाले होते. तो पहिल्या पत्नीबरोबर राहत नव्हता. त्यानंतर त्याने प्रयत्ना हिच्याबरोबर 2021 मध्ये विवाह केला. ती चार महिन्यांपासून माहेरी राहत होती. त्यातच तिने आपल्या प्रेमसंबंधाबद्दल कोहिनूर याला सांगितले होते, असे फिर्यादित नमूद आहे. यातूनच तो ताणतणावात होता.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news