पुणे : पुढारी वृत्तसेवा: आगामी तीन दिवस राज्यातील फक्त नऊ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, उर्वरित भागांत मात्र तुरळक पाऊस राहील. रविवारी मान्सूनने गुजरात व मध्य प्रदेशात मुसंडी मारत पुढे सरकण्यास सुरुवात केली आहे.
जूनचा दुसरा आठवडा संपत आला असला, तरीही यंदा मान्सून पाहिजे तसा महाराष्ट्रात बरसला नाही. कारण, हवेचा दाब अनुकूल नाही.
25 जूनपासून राज्यात हवेचा दाब कमी होणार असल्याचे भाकीत हवामानतज्ज्ञांनी केले आहे. दरम्यान, रविवारी (दि. 19 ) मान्सूनने गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांत प्रगती केली. गेल्या चोवीस तासांत राज्यात फक्त मालवण व सिंधुदुर्ग येथेच 110 मिलिमीटर पाऊस झाला. बाकी ठिकाणी खूप कमी पावसाची नोंद झाली आहे.
20 ते 23 जूनदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील एकूण नऊ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यात पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी 'ऑरेंज अलर्ट'; तर पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.
कोकण : मालवण (100), रत्नागिरी 40.3, कुडाळ, अलिबाग 30.9
उत्तर महाराष्ट्र : बोदवड (50), एरंडोल (20.8), जामनेर (20.5)
मराठवाडा : देगलूर (40.5), सोयगाव (40), सेलू (30.7), परळी वैजनाथ (10.9)
विदर्भ : अमरावती (60.6), साकोली (50.3), तिवसा (50.1), चांदुरबाजार (40.8), वाशिम (30.8), काटोल (30.7), मोर्शी (30.6), तिरोडा (30.3), पवनी (30.2)
घाटमाथा : धारावी (20), दवडी, ताम्हिणी
हेही वाचा