‘Mirzapur 3’ येण्याआधीच कालीन भैयाने केली स्टोरी लीक | पुढारी

‘Mirzapur 3’ येण्याआधीच कालीन भैयाने केली स्टोरी लीक

पुढारी ऑनलाईन डेस्क : मिर्झापूर ही ॲमेझॉन प्राइममधील सर्वाधिक लोकप्रिय वेब सीरिज आहे. अल्पावधीत लोकप्रिय झालेली आणि प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या ‘मिर्झापूर’ या वेबसीरिजचा तिसरा (Mirzapur 3) सीझन कधी येतो, याकडे चाहते आतूरतेने वाट पाहत आहेत. आधीच्या सीझनची कथा जिथून संपली आहे तिथून पुढे मिर्झापूर सीझन 3 ची कहाणी सुरू होईल.  त्यासाठी चाहत्यांना किती दिवस वाट पाहावी लागणार आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आता या मालिकेच्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा चाहते करत आहेत. मात्र, अभिनेता पंकज त्रिपाठीच्या मुलाखतीनंतर त्याने तिसऱ्या सीझनची कथा लीक केल्याचे बोलले जात आहे.

‘मिर्झापूर’च्या तिसर्‍या सीझनची घोषणाही झाली असून तिसर्‍या सीझनची कथा काय असेल यावर लोक अंदाज बांधत आहेत. यासोबतच लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की, तिसर्‍या सीझनमध्ये कालिन भैया आणि मुन्ना भैया जिवंत होणार का? कारण दुसऱ्या सीझनमध्ये मुन्ना भैया आणि कालिन भैय्याचे यांना गोळी लागली होती. यामुळे हा प्रश्न लोकांच्या मनात येत आहे. आता लवकरच ‘मिर्झापूर 3’चे शूटिंग सुरू करणार असलेल्या कालिन भैय्याने या प्रश्नाचे उत्तर देताना ताे असे काही बाेलला की, ज्यामुळे मिर्झापूर 3 ची संपूर्ण कथा रसिकांना माहीत झाली.

‘मिर्झापूर सीझन 3’ साठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अलीकडेच कालेन भैयाची भूमिका साकारणाऱ्या पंकज त्रिपाठीने एका वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यादरम्यान, त्याने असे काही सांगितले की लोकांना तिसऱ्या सीझनच्या कथेचा संकेत मिळाला आहे. पुढे तो असंही म्हणाला की, ‘लवकरच कॉस्टयूमची चाचणी घेणार आहे. त्यानंतर आठवड्याभरात त्याचे शूटिंग सुरू होईल. सध्या संपूर्ण स्क्रिप्ट ऐकण्यावर तो भर देत आहे. पंकज पुन्हा कालीन भैय्या भुमिका साकारण्यासाठी उत्सुक आहे. (Mirzapur 3)

‘मिर्झापूर’ वेब सीरिजच्या दोन्ही सीझननी कहर केला आहे. या वेब सिरीजमध्ये सत्तेची भूक, शत्रुत्व आणि प्रेमाचा कोनही जबरदस्त दाखवण्यात आला आहे. यासोबतच अनेक बोल्ड सीन्स यामध्ये दाखविणयात आले आहेत. दुसऱ्या सीझनचा शेवटचा एपिसोड ज्या वळणावर सोडला त्यामुळे तिसर्‍या सीझनबद्दल चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. सध्या हे स्टार्स लवकरच तिसऱ्या सीझनच्या शूटिंगला सुरुवात करणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pankaj Tripathi (@pankajtripathi)

Back to top button