

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पीएमपीच्या वतीने सोमवार (दि. १) रोजी दुपारनंतर शहरातील काही मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा आणि साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती असल्यामुळे मध्यवस्तीत होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे.
यात सोमवारी बस मार्ग क्र. २. २, ३, ४, १०, ११, ११, ११क. १२. १३, १५, १७, २०, २१, २६, २८, ३०, ३७, ३८, ४२, ४७, ५०, ५२, ५२, ६४ ६४ ६६, ६८, ६९, ७०, ७१. ७२ ७८ ८९ ९० १०३, १११, ११७, ११८, ११८, १९९, २१६, २२७ २२७, २३१ २३२, २३३, २३३अ, २३३, २९४, २९५ २९७ २९८, २९९, ३३९, ३५४ या मार्गांच्या बस जेधे चौक, सारसबाग या ठिकाणी रस्ता बंद झाल्यास ही वाहतूक दुपार पाळीमध्ये लक्ष्मी नारायण टॉकीजकडून डाव्या बाजूस वळवून मित्र मंडळ चौक, सारसबाग मार्गे संचलनात ठेवण्यात येणार आहे.
तसेच, स्वारगेट येथील नटराज बस स्थानकाचा रस्ता बंद झाल्यास बस स्थानकावरून सुटणा-या बस खंडोबा मंदिर, पर्वती पायथा येथून सुटतील व रस्ता सुरू झाल्यानंतर नेहमीप्रमाणे नटराज बसस्थानकाहून बसेस सुटतील. या बदलाची प्रवाशी नागरीकांनी नोंद घ्यावी व परिवहन महामंडळास सहकार्य करावे, असे आवाहन पीएमपीकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा :