

पुणे, पुढारी वृत्तसेवा: टास्क फ्रॉडद्वारे जादा परताव्याचे प्रलोभन दाखवत सायबर चोरट्यांनी एका तरुणाला 3 लाख रुपयांचा आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शास्त्रीनगर कोथरूड येथील 22 वर्षीय तरुणाने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर चोरट्याने तरुणासोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क केला. त्यानंतर त्याला टास्कचे काम दिले. त्यासाठी सुरुवातीला त्याचे काही पैसे तरुणाच्या खात्यावर जमा केले. पुढे पेड टास्कद्वारे अधिक परतावा मिळेल, असे प्रलोभन दाखवून वेळोवेळी त्यांच्या खात्यातून ३ लाख १ हजार ४०० रुपये भरून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याबाबत तरुणाने तक्रार दिली होती.
हेही वाचा: