

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहराला पाणीपुरवठा करणार्या धरणांमधील पाणीसाठ्याचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज (शनिवारी) आढावा घेणार आहेत. धरणांमधील पाणीसाठा 72.65 टक्क्यांवर पोहचल्याने आणि खडकवासला धरण 96 टक्के भरल्याने शहरात सुरू असलेली पाणीकपात रद्द होण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. धरणातील पाणी साठ्याचा अंदाज घेऊन एप्रिल-मे महीन्यात शेतीसाठी उन्हाळी आवर्तने दिली जातात. तसेच साधारणपणे जुलै ते ऑगस्ट महीन्याच्या पहील्या पंधरवड्यापर्यंत शहरातील पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी नियोजन कालवा समितीच्या बैठकीत केले जाते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा धरणातील पाणीसाठा हा जास्त असल्याने यंदा शहरात जुन महीन्यात पाणी कपात सुरु केली गेली.
आठवड्यातून एक दिवस शहरातील पाणी पुरवठा बंद ठेवला जात आहे. खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जुन महीन्यात अपेक्षित पाऊस पडला नाही. तीस जुन रोजी धरणांत एकुण 4.70 टिएमसी इतका पाणीसाठा होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत तो अधिक होता. परंतु पाऊस न पडल्याने पाणी कपातीचा निर्णय घेण्याची वेळ आली होती. जुलै महीन्यात मात्र पावसाने धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगली हजेरी लावली आहे. खडकवासला, पानशेत, वरसगांव आणि टेमघर या चारही धरणातील एकुण पाणीसाठा 21.18 टिएमसीपर्यंत पोचला आहे. गेल्यावर्षी याच दिवशी 21. 46 टिएमसी इतका पाणीसाठा होता. तुलनेत गेल्यावर्षीच्या तुलनेत थोडा कमी पाणी साठा आहे. परंतु, मान्सुनचे आणखी दोन महीने बाकी आहेत. या कालावधीतही धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ शकते. वर्षभराची पुणे शहराची पाण्याची गरज भागविली जाऊ शकते एवढा पाणीसाठा हा चारही धरणांत झाला आहे.
यापार्श्वभुमीवर मनसे, शिवसेना (ठाकरे गट), आरपीआय या पक्षांबरोबरच स्वंयसेवी संस्थांकडून पाणी कपात रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच आंदोलनाचा इशाराही पक्षांनी दिला आहे. यापार्श्वभुमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पाणी आढावा बैठक होत आहे. या बैठकीत शहराच्या पाणी पुरवठा आणि शेतीकरीता आवश्यक पाणी पुरवठा यांसाठी पाण्याची उपलब्धतेविषयी चर्चा केली जाईल. या बैठकीत पुणे शहरात सुरु असलेल्या पाणी कपातीचा निर्णय रद्द होण्याची शक्यता महापालिका प्रशासनाकडून व्यक्त केली जात