

टाकळी हाजी : जून महिना अर्धा संपला तरी शिरूर तालुक्यातील मलठण परिसर पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र पावसाने दडी मारली. मलठण, लाखेवाडी, थोरात वस्ती, दंडवते मळा, माळी मळा, शिंदेवाडी या भागात शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. शेजारील गावांमध्ये पाऊस झाल्यामुळे आशावादी असलेल्या शेतकर्यांनी खरीप हंगामाची कामे गतीने उरकून घेतली आहेत.
तीन दिवसांपासून शेजारील गावांमध्ये पाऊस पडतो पण या भागात मात्र पावसाने दडी मारली आहे. गेल्या वर्षी पावसाची अनियमितता व दुबार पेरणीचे संकट यामुळे मेटाकुटीला आलेल्या बळीराजाची आशा यंदा हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजामुळे पल्लवित झाली होती. परंतु पावसाळ्याच्या सुरवातीलाच पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना सुरवात झालेली नाही. पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू शकते, असे माजी ग्रामपंचायत सदस्य विक्रम मावळे यांनी सांगितले.
हेही वाचा