पावसाची दडी; पेरण्या खोळंबल्या! | पुढारी

पावसाची दडी; पेरण्या खोळंबल्या!

बारामती, पुढारी वृत्तसेवा: बारामती तालुक्यात पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. जून निम्मा संपूनही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. शहर आणि तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून उन्हाचा कहर सुरू असून घामांच्या धारांनी नागरिक हैराण झाले आहेत. दिवसभर प्रचंड उन्हाचा तडाखा जाणवत असून, सायंकाळी सुटत असलेल्या वार्‍याने पावसाची दिशा बदलली आहे.

पावसामुळे शेतीची कामे खोळंबली असून, बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. मे महिन्यातही अवकाळीने बारामतीला हुलकावणी दिली होती. तालुक्यात अजूनही मुसळधार आणि समाधानकारक पाऊस झाला नसल्याने खरीपातील बाजरी, कडधान्ये आदींच्या पेरण्या रखडल्या आहेत. पालखी सोहळा तोंडावर असल्याने पाऊस झाला नसल्याने अनेकांना वारी चुकण्याची भीती आहे.

भाजपचे सर्व आमदार शनिवारपासून ‘ताज’मध्ये

अनेक शेतकरी पाऊस झाल्यानंतर शेतातील पेरण्या पूर्ण करून पंढरीची वारी करतात. मात्र, मान्सूनच्या सद्य:स्थितीबाबत वारंवार बदल होत असल्याने बारामती तालुका दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सध्या तालुक्याची शेतीची तहान निरा डावा कालवा आणि निरा नदीवरून भागवली जात असली तरीही शेतीसह, जनावरांच्या पाण्याचा, चार्‍याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकर्‍यांना आहे. दरवर्षी वेळेवर दाखल होणारा पाऊस लांबला असल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. पाऊस झाला नाही तर पेरण्या कशा करणार, असा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे.

पालखी प्रस्थान जवळ, पण पावसाचा पत्ता नाही

पालखी प्रस्थान आता अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपले असतानाही बारामती तालुक्यात पावसाचा पत्ता नाही. परिणामी पेरणीची कामे खोळंबली आहेत. पेरणी उरकून वारीत सहभागी होणार्‍यांना दुहेरी चिंतेने ग्रासले आहे. गेली दोन वर्षे पायी वारीचा आनंद घेता आला नाही, यंदा कोरोना कमी झाल्याने जाणे निश्चित केले तर पावसाचा पत्ता नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या पाच दिवसांत जोरदार पावसाची शक्यता

भाजपचे सर्व आमदार शनिवारपासून ‘ताज’मध्ये

वटपौर्णिमेला विधवांना दिला हळदी-कुंकवाचा मान

Back to top button