बार्टी आता 300 जणांना देणार मोफत प्रशिक्षण

बार्टी आता 300 जणांना देणार मोफत प्रशिक्षण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्वतयारीसाठी दिल्ली येथे आता अनुसूचित जातीतील 300 विद्यार्थ्यांना मोफत विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

2022-23 या वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. यापूर्वी 200 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात होते. बार्टीमार्फत चाचणी परीक्षा घेऊन यूपीएससी परीक्षेची पूर्वतयारी करणार्‍या 300 विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणासाठी निवडले जाणार आहे. दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेस देण्यात येणारे संपूर्ण प्रशिक्षण शुल्क, विद्यार्थ्यांना उपस्थितीनुसार दरमहा दोन हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. याशिवाय पहिल्या महिन्यातील आर्थिक सहाय्य 3 हजार रुपये आणि सुरुवातीच्या दिल्ली येथील प्रवासासाठी 5 हजार रुपये व प्रशिक्षण संपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी 5 हजार रुपये प्रवास भत्ता देण्यात येणार आहे.

प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी बार्टीच्या हीींिीं://लरीींळ.ळप या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news