

मंचर : दागिन्यांना पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने पिंपळगाव घोडे (ता. आंबेगाव) येथील नवाबाई किसन लाडके यांचे दागिने दोघांनी हातचलाखीने लंपास केले. 60 हजारांचे दागिने चोरल्याप्रकरणी नवाबाई लाडके यांनी घोडेगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे.
दोन अनोळखी इसमांनी लाडके (वय 50, रा. पिंपळगाव घोडे) यांच्या घरी येऊन दागिन्यांना पॉलिश करून देतो, असे सांगितले. दागिने कुकरमध्ये हळदीच्या पाण्यात ठेवण्यास सांगून हातचलाखी करून दागिने पळवून नेले.