Narhari Zirwal : राजकीय घडामोडींमुळे झिरवाळ मतदारसंघात चर्चेच्या केंद्रस्थानी

नरहरी झिरवाळ,www.pudhari.news
नरहरी झिरवाळ,www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा
दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा विद्यमान विधानसभा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ हे राजकीय घडमोडीत दररोज टीव्हीवर झळकत असून, त्यांची भूमिका सत्ता स्थापनेत महत्त्वाची ठरणार असल्याचे सध्या तालुक्यात झिरवाळ चांगलेच चर्चेत आहेत.

शिवसेनेत फूट पडल्याने तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल झाली आहे. आगामी काळात धनराज महाले यांना तिकीट मिळते की, रामदास चारोस्कर यांना तिकीट मिळते, याबाबत आतापासूनच चर्चा झडत आहेत. तालुक्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा कोणताही परिणाम सध्या तरी दिसत नसल्याने कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहील, असे चित्र आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये विधानसभा उपाध्यक्ष असल्याने झिरवाळ हे जिल्ह्यात चांगलेच चर्चेत आले आहेत. झिरवाळ यांच्या रूपाने दिंडोरीकरांना विधानसभा व मंत्रालय पाहता आले. त्यांच्याप्रमाणे पक्षातील इतर नेत्यांनीही तालुक्याचे नाव पुढे आणावे अशी भावना ज्येष्ठ जनतेतून व्यक्त होत आहे. दरम्यान, देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले असता, त्या सभेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही ना. झिरवाळ यांचा उल्लेख केला होता. झिरवाळ हे आदिवासी भागातील कार्यकर्त्यांना समस्या मांडण्यासाठी घेऊन येतात, असे राज्यपाल कोश्यारी म्हणाले होते. त्यांच्या माध्यमातून दिंडोरीचे नाव देशपातळीवर झळकत असल्याची भावना ज्येष्ठ नेते विश्वासराव देशमुख यांनी व्यक्त केली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news