पुणे : पाबळ-केंदूर जि. प. गटामध्ये मोठे बदल

पुणे : पाबळ-केंदूर जि. प. गटामध्ये मोठे बदल

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रारूप आराखड्यानंतर पाबळ -केंदूर जिल्हा परिषद गटामध्ये मोठे बदल झाले असून या गटाचे नावच बदलून कान्हूर मेसाई -करंदी असे करण्यात आले आहे.

पूर्वीच्या केंदूर गणामध्ये धामारी या गावाचा समावेश प्रारूप आराखड्यात करण्यात आला होता. राज्य महामार्गाची भौगोलिकता व सलगता सोडून धामारी या गावाचा समावेश केंदूर व सध्याच्या करंदी गणात करण्यात आल्यानंतर पाबळचे माजी सरपंच सोपान जाधव यांनी त्यास हरकत घेतली होती. ही हरकत मान्य करण्यात आली असून पूर्वीच्या केंदूर गणात समावेश झालेल्या धामारी गावाचा समावेश आता नव्याने कान्हूर मेसाई पाबळ या गणामध्ये झाल्याचे जाधव यांनी सांगितले.

मुळात कान्हूर मेसाई- करंदी हा जिल्हा परिषद गट पूर्वीपासून पाबळ-केंदूर असा ओळखला जात होता. या गटातील पाबळ व केंदूर ही दोन्ही मोठी लोकसंख्येची गावे आहेत. प्रत्येकी नऊ हजार मतदार या दोन्ही गावांमध्ये आहेत. परंतु कान्हूर मेसाई हे रांजणगाव गटात असलेले गाव व मिडगुलवाडी हे टाकळी हाजी गटात असलेले गाव नव्याने नामकरण केलेल्या कान्हूर मेसाई करंदी गटामध्ये आलेली आहेत.

पूर्वीच्या पाबळ गणातील धामारी हे गाव काढून नव्याने तयार करण्यात आलेल्या करंदी गणात टाकण्यात आले होते. परंतु भौगोलिकता पाहता धामारी गावाचा समावेश चुकीच्या पद्धतीने केंदूर गणात झाला होता त्यावरच आम्ही आक्षेप घेतल्याने आमचा आक्षेप मान्य होऊन केंदूर गावाचा समावेश पुन्हा मूळ गणात झाल्याचे हरकत घेणारे माजी सरपंच सोपान जाधव यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news