पिंपरी : अतिक्रमण विभागाकडून नवी सांगवीत कारवाई

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने नवी सांगवी येथील अतिक्रमणे हटविली.
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने नवी सांगवी येथील अतिक्रमणे हटविली.

पिंपळे गुरव : पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या ह क्षेत्रिय कार्यालयाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने नवी सांगवीत नुकतीच अतिक्रमण विभागाकडून धडक कारवाई करत कृष्णा चौक ते एम. एस. काटे चौक दरम्यानचे अतिक्रमण हटविण्यात आले. पालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाने सहा अनधिकृत हातगाड्या तसेच अनिधकृत फ्लेक्स हटविण्यात आले.

त्याचबरोबर मोठे जाहिरात फलकदेखील हटविण्यात आले. सकाळच्या सुमारास कारवाई झाल्याने बघ्यांची गर्दी झाली होती. कारवाई करताना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून अतिक्रमण निर्मूलन पथकाबरोबर पोलीसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. या वेळी दुकानदारांना अतिक्रमण विभाग कडून झाडावर जाहिराती न लावण्याबाबत समज देण्यात आली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news