

उंडवडी : पुढारी वृत्तसेवा: उंडवडी सुपेसह आजूबाजूच्या परिसरात जूनचे पहिले दोन दिवस पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, नंतर पाऊस रोज नुसत्या वाकुल्याच दाखवीत असल्याने पेरण्यांना उशीर होणार असल्याची चिंता शेतकर्यांना भेडसावत आहे.
पाऊस वेळेवर व समाधानकारक होईल, या आशेने शेतकर्यांनी मशागतीसह खते टाकणे व नांगरट सुरू केली. बियाणेही खरेदी करून आणून ठेवले. मात्र, नंतर पावसाने हुलकावणी दिल्याने पेरणीसह मशागती ठप्प झाल्या आहेत. तसेच उशिरा पेरणीमुळे उत्पादन खर्चात वाढीचीही चिंता सतावत आहे.
उंडवडी सुपेसह आजूबाजूच्या परिसरात रोज दाट ढग दाटून येतात. मात्र, पाऊस होत नसल्याने शेतकर्यांचा हिरमोड होत आहे. पंधरा जूननंतर खरिपाच्या पेरण्यांना सुरुवात होते. परंतु, पावसाअभावी यंदाही पेरण्या लांबतील की काय, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
हेही वाचा