पुणे, पुढारी वृत्तसेवा: 'पंकजा मुंडे यांची काळजी करायला भाजप समर्थ आहे. त्यांनी चिंता करू नये,' असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे. 'पंकजा मुंडे या पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरातील मुलगी आहेत. त्यामुळे त्यांची काळजी करण्याची वेळ आली नाही. आम्ही समर्थ आहोत,' असेही पाटील यांनी म्हटले आहे.
भाजपमध्ये पंकजा मुंडे यांना एकटे पाडण्याचा डाव सुरू असून, त्यांच्या समर्थकांना तिकीट दिले जात आहे आणि पंकजा मुंडे यांना वार्यावर सोडल्याची टीका राऊत यांनी केली होती. त्याचा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना देहूमध्ये चांगलाच समाचार घेतला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देहू येथे शिळा मंदिराच्या उद्घाटनास येणार आहेत. यानिमित्त फ्लेक्सवर पांडुरंगापेक्षा पंतप्रधानांचे फोटो मोठे केल्याची टीका होतेय; त्यावर बोलताना पाटील म्हणाले,
'राष्ट्रवादी काँग्रेसने तसे फ्लेक्स लावावेत, काहीच हरकत नाही. कार्यकर्त्यांनी उत्साहाने ते लावले आहेत, पक्षाने नाही. राष्ट्रवादीने पांडुरंगाचे फोटो मोठे लावावेत, मोदींचे छोटे लावावे किंवा लावू नयेत,' असा टोलाही लगावला. खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, 'नाचता येईना अंगण वाकडे, त्यांना पराभव दिसत होता म्हणून त्या पराभवाच्या स्क्रिप्टवर बोलत
हेही वाचा