

पुणे : पुढारी वृत्तसेवा: पालखी सोहळ्यावेळी वारकरी आणि शहरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत पालखीचे सर्व अपडेट टि्वटर हँडलद्वारे लाइव्ह देण्याची सोय उपलब्ध केली आहे. त्यामुळे नागरिकांना पालख्यांचे शहरात आगमन झाल्यानंतर कोणती पालखी सध्या कोणत्या ठिकाणी आहे, त्याचबरोबर या वेळी वाहतुकीसाठी कोणते मार्ग बंद व चालू आहेत, याची एका क्लिकवर माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शिस्तबध्द असतो. कोरोनानंतर दोन वर्षांनी पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होण्याची शक्यता पाहता त्यांची गैरसोय टाळण्यासाठी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी टि्वटरच्या माध्यमातून सुविधा पुरविण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. या पालखी सोहळ्यात संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी कुठे आहे, याचे अपडेट दोन-दोन मिनिटांना मिळणार आहेत.
या आधारे कोणते रस्ते वाहतुकीसाठी उपलब्ध आहेत, कोणते नाही, याची स्पष्टोक्ती देखील होणार आहे. नकाशाच्या माध्यमातून हे लाइव्ह अपडेट नागरिकांना मिळणार आहे. पालखी मार्गांची सर्व माहिती नागरिकांसह वाहनचालकांना मिळावी, यासाठी पुणे पोलिसांनी वर्ळींशीीळेपर्.िीपशिेश्रळलश.र्सेीं.ळप हे खास वेबपेज तयार केले आहे. त्यामुळे मोबाईलसह लॅपटॉप क्लिकवर अपडेट मिळणार आहे. तसेच, वाहतुकीतील बदलही समजणार आहेत. पालखी प्रस्थानादरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या वेबपेजचा उपयोग होणार आहे.
हेही वाचा