चोरीच्या दुचाकी विकणार्‍याला अटक

चोरीच्या दुचाकी विकणार्‍याला अटक

पुणे : पुढारी वृत्तसेवा: चोरीची दुचाकी विकण्यासाठी आलेल्या चोरट्याला दरोडा व वाहनचोरीविरोधी पथक-2 च्या कर्मचार्‍यांनी अटक केली. रोहन ऊर्फ लोकेश दत्ता धावडे (वय 27, रा. पर्वती दर्शन) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून हडपसर, विश्रांतवाडी आणि शिरवळ पोलिस ठाण्यांतील तीन गुन्हे उघडकीस आले.

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-2चे पोलिस उपनिरीक्षक गुंगा जगताप यांचे पथक गस्त घालत होते. यादरम्यान हडपसर पोलिस स्टेशनच्या हद्दीत गाडीतळाखाली एक जण स्प्लेंडरवर थांबल्याची माहिती पोलिस नाईक शिवाजी जाधव यांना मिळाली. यानुसार पोलिसांच्या पथकाने सापळा रचून संशयित धावडेला ताब्यात घेतले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news