रेल्वेस्थानकावर बंदोबस्तात वाढ; ‘अग्निपथ योजनेविरोधात आंदोलनाचे पडसाद | पुढारी

रेल्वेस्थानकावर बंदोबस्तात वाढ; ‘अग्निपथ योजनेविरोधात आंदोलनाचे पडसाद

पुणे : पुढारी वृत्तसेवा: ‘अग्निपथ योजनेविरोधात उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद पुणे रेल्वेस्थानकावर उमटू नयेत, याकरिता रेल्वे प्रशासनाने पुणे रेल्वेस्थानकावरील बंदोबस्तात वाढ केली आहे. ‘अग्निपथ’मुळे रेल्वेगाड्यांना आगी लावण्याच्या आणि तोडफोड करण्याच्या घटना वाढत आहेत.

त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला असून, देशातील सर्व रेल्वेस्थानकांवरील बंदोबस्तात वाढ केली आहे. पुणे रेल्वेस्थानकातूनसुध्दा उत्तर प्रदेशात अनेक गाड्या जात आहेत. या गाड्यांनाही या हिंसक आंदोलनाचा फटका बसू शकतो. पुणे रेल्वेस्थानकावर काही अनुचित घटना घडू नये, याकरिता रेल्वे प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.

प्रवाशांच्या मदतीसाठी हेल्प डेस्क

आंदोलनामुळे उत्तर प्रदेशात जाणार्‍या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. अनेक प्रवासी रेल्वेस्थानकावर येऊन चौकशी करीत आहेत. त्यांना योग्य ती माहिती देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने येथे हेल्प डेस्क सुरू केला आहे. तसेच, रेल्वे प्रशासनाने रद्द झालेल्या गाड्यांच्या तिकिटाचे पैसे परत देण्याची देखील व्यवस्था केली आहे. ऑनलाइन तिकीट ज्यांनी काढले आहे, त्यांना ऑनलाइन रिफंड मिळणार आहे आणि तिकीट काउंटरवर ज्यांनी तिकीट काढले आहेत त्यांना तेथेच परतावा मिळेल, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

वाळवा तालुक्यात खरिपाची 8.5 टक्के पेरणी

आरपीएफच्या फौजफाट्यात वाढ

रेल्वेस्थानकाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी रेल्वेचे आरपीएफ पथक (रेल्वे सुरक्षा बल) तैनात करण्यात आले आहे. आंदोलनाचा धोका लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने यात वाढ केली असून, नेहमीपेक्षा जास्त फौजफाटा तैनात केला आहे.

डॉग स्क्वॉडकडून रेकी

मागील महिन्यात पुणे रेल्वेस्थानकावर बॉम्बसदृश वस्तू सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यामुळे येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यातच आता देशात सुरू असलेल्या आंदोलनामुळे पुणे रेल्वेस्थानकावर अनुचित प्रकार घडू नये, याकरिता डॉग स्क्वॉडमार्फत पुणे रेल्वे स्टेशन आणि परिसराची रेकी करण्यात येत आहे.

देशभरात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून पुणे स्थानकावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. यात आरपीएफच्या ताफ्यात वाढ केली असून, डॉग स्क्वॉडकडूनही येथे सातत्याने पाहणी करण्यात येत आहे.

                   – मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे, पुणे विभाग

हेही वाचा

दिशाने केले चाहत्यांना क्‍लीन बोल्ड

दीपिका म्हणते, ‘ते’ येतच राहोत

सोलापूर : ‘पीओपी’च्या चार लाख गणेशमूर्ती विक्रीचा पेच

Back to top button