चिमुकलीसमोर अभियंता बापाने घेतला आईचा बळी

चिमुकलीसमोर अभियंता बापाने घेतला आईचा बळी

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड येथे उच्चशिक्षित अभियंता तरुणाने आपल्या एमबीए असलेल्या पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शिवम पंकज पचौरी उर्फ भारतद्वाज (वय 32) याला हिंजवडी पोलिसांनी 10 जून रोजी बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अवंतिका शर्मा (वय 30), असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. आरोपी शिवम हा दररोज मद्यपान करून पत्नीला मारहाण करायचा. यातूनच टोकाचे पाऊल उचलत 9 जून रोजी रात्री साडेदहा वाजता पत्नीचा खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी शिवम याने नुकतीच आयटी कंपनीतील नोकरी सोडली होती. तो बेरोजगार होता.

दररोज दारू पिऊन पत्नीला मारहाण करीत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दोघांमध्ये सतत किरकोळ कारणांवरून वाद होत होते. गुरुवारी शिवम मद्यपान करून घरी आला होता. त्यांनतर पत्नीसोबत झालेला वाद इतका टोकाला गेला की, आरोपी पती शिवम याने पत्नीच डोकं अगोदर भिंतीवर मग किचनवर आपटले.

खाली कोसळल्यावर साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसमोर तिच्या आईचा गळा आवळून खून केला. या घटनेनंतर स्वतःच शिवमने पोलिस कंट्रोलला फोन करून घटनेची माहिती दिली. आरोपी शिवमला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा अधिक तपास हिंजवडी पोलिस करीत आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news