गुनाट येथे पाच एकर ऊस जळून खाक

गुनाट येथे पाच एकर ऊस जळून खाक

निमोणे : पुढारी वृत्तसेवा: गुनाट (ता. शिरुर) येथे विद्युत तारांमध्ये झालेल्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत तीन शेतकर्‍यांचा पाच एकर ऊस जळून खाक झाला. शामकांत गोरडे यांच्या शेतातील उसाला बुधवारी (दि. 22) सायंकाळी सहाच्या दरम्यान विद्युत वितरणाच्या तारांचे घर्षण होऊन आग लागली. क्षणार्धात या आगीने रौद्र रूप धारण केले. शाम गोरडे यांच्या शेतातील पूर्ण वाढ झालेला ऊस जळून खाक झाला व या आगीच्या कवेत शेजारील शेतकरी रामदास गोरडे, अमोल गोरडे यांच्याही शेतातील ऊस आला. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे काही क्षणातच या तीनही शेतकर्‍यांना आपल्या डोळ्यासमोर आपल्या पिकाचे कोळसा झाल्याचे दुर्दैवी चित्र पहायला मिळाले.

दरम्यान तलाठी विजय बेंडभर, पोलिस पाटील हनुमंत सोनवणे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला. तीनही शेतकर्‍यांचे एकूण आठ ते नऊ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे दरम्यान महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला असता पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आम्ही तारा दुरुतीचे काम हातात घेतले आहे. ज्या ठिकाणी तारा तुटण्याची शक्यता शेतकर्‍यांना वाटत असेल त्यांनी तातडीने महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. ज्या शेतकर्‍यांचा ऊस जळाला आहे, त्यांना नियमाप्रमाणे भरीव मदत मिळावी म्हणून महावितरण सहकार्य करील, अशी माहिती अभियंता टेंगले यांनी दिली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news