पिरंगुटला चार चोरट्यांना अटक; 3 लाख 46 हजारांचा माल जप्त | पुढारी

पिरंगुटला चार चोरट्यांना अटक; 3 लाख 46 हजारांचा माल जप्त

पौड : पुढारी वृत्तसेवा: पिरंगुट (ता. मुळशी) येथील जवाहर इंडस्ट्रीयल इस्टेट कंपनीतील मालाची चोरी करणार्‍या चौघांना पौड पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून 3 लाख 46 हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. आशिष अरुण गायकवाड (वय 29), दत्ता भारत भोसले (वय 29), गणेश सुनील घोडके (वय 25) आणि सूरज अनंत गायकवाड (वय 25, सर्व रा. पानमळा वसाहत, सिंहगड रोड, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.

पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिरंगुट येथील अस्ट्रॉन व्होल्टेक कंपनीत 18 जून रोजी एकूण 3 लाख 46 हजार रुपयांचा माल चोरीला गेला होता. यातील आरोपींचा पोलिस शोध घेत होते. दरम्यान सदर आरोपी चोरलेला माल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना अटक केली.

चौकशीत आशिष गायकवाड याने वरील साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून चोरीसाठी वापरलेला टेम्पो आणि चोरीचा माल असा एकूण अंदाजे साडेसात लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रमेश गायकवाड, रॉकी देवकाते, चंद्रकांत सोनवणे, सिद्देश पाटील, साहील शेख आदींनी केली.

हेही वाचा

नरेश्वर डोंगरावर आढळल्या दुर्मीळ पाली

श्रीरामपूर : पंढरपूर वारीसाठी आता थेट गावातून एसटी बस

नाशिक : दागिने चोरून विवाहिता दुसर्‍याच व्यक्तीसोबत झाली पसार

Back to top button