खोरला पेयजल योजनेसाठी 1 कोटी 80 लाखांचा निधी

खोरला पेयजल योजनेसाठी 1 कोटी 80 लाखांचा निधी

खोर : पुढारी वृत्तसेवा : खोर (ता. दौंड) येथील पेयजल योजनेच्या कामासाठी 1 कोटी 80 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. नुकतेच या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या योजनेमुळे उन्हाळ्यातील पाण्याची भीषण टंचाई दूर होऊन महिलांच्या डोक्यावरील हंडा दूर होणार आहे. केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन 'हर घर जल' उत्सवांतर्गत सन 2021 मध्ये खोर गावाची निवड करून त्या संदर्भात एक समिती स्थापन केली होती. दरम्यान, आमदार राहुल कुल यांनी पाठपुरावा करत या योजनेसाठी 1 कोटी 80 लाख रुपये निधी प्राप्त करून दिला. तर माजी सरपंच सुभाष चौधरी, माजी उपसरपंच पोपट चौधरी, उज्ज्वला विकास चौधरी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी आमदार राहुल कुल यांना या योजनेसाठी निवेदन दिले होते. नुकतेच या योजनेचे काम सुरू करण्यात आले.

या प्रसंगी माजी सरपंच शिवाजी पिसे, सुभाष चौधरी, शिवाजी चौधरी, भाऊसाहेब कुदळे, विकास चौधरी, श्याम चौधरी, दादा शिंदे, सागर चौधरी, लक्ष्मण गायकवाड, विजय कुदळे, मारुती फडतरे, छगन चौधरी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. ही योजना केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन 'हर घर जल' उत्सवांतर्गत जलशक्ती मंत्रालय पेयजल आणि स्वच्छ्ता विभाग यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. याशिवाय यवत, वरवंड, केडगाव, भांडगाव, लिंगाळी, कडेठाण, कासूर्डी, स्वामी चिंचोली, पडवी, बिरोबावाडी, कुरकुंभ या गावातही पेयजल योजना राबविण्याबाबत आमदार राहुल कुल यांनी प्रयत्न केले आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news