पुणे : नशेसाठी मोबाईल चोरी करणारा गजाआड | पुढारी

पुणे : नशेसाठी मोबाईल चोरी करणारा गजाआड

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अमली पदार्थाची नशा करण्यासाठी मोबाईल चोरी करणार्‍याला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. तो पहाटे उघडी खिडकी आणि दरवाजावाटे ही चोरी करीत होता. त्याच्याकडून 5 लाख 68 हजार 300 रुपयांचे तब्बल 32 मोबाईल व एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. रय्यान ऊर्फ फईम फय्याज शेख (वय 20, मिठानगर, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या नशेबाज चोराचे नाव आहे. सोमवार पेठेतील हिरा सदन बिल्डिंगमधून एका घराचे दार उघडे असताना 33 हजारांचे 4 मोबाईल आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना 3 सप्टेंबर रोजी घडली होती.

याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास युनिट 1 चे पथक करीत होते. या गुन्ह्यातील आरोपी भवानी पेठेतील त्रिवेणी गार्डन येथे येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार दत्ता सोनावणे यांना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली होती. यानंतर सापळा रचून रय्यान शेखला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याच्या जवळ असणार्‍या बॅगमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे 32 मोबाईल आढळून आले. चोरी करण्यासाठी त्याने दुचाकी चोरल्याचे सांगितले.

रय्यान याने खडक, फरासखाना, कोंढवा, समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुलै 2023 ते 3 सप्टेंबर या कालावधीत चोर्‍या केल्या आहेत. त्याच्याकडून आतापर्यंत 9 गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनखाली युनिट 1 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक पोलिस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलिस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, पोलिस अंमलदार दत्ता सोनवणे, अण्णा माने, अभिनव लडकत, शुभम देसाई, अमोल पवार, अजय थोरात, शशिकांत दरेकर यांनी केली.

डोक्यात सळई पडून बांधकाम मजूर ठार

इमारतीच्या बांधकामावेळी तिसर्‍या मजल्यावरील मजुराच्या डोक्यात सळई पडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना 28 ऑगस्टला दुपारी एकच्या सुमारास मांजरी बुद्रुक परिसरातील मांजराई व्हिलेज या ठिकाणी घडली. विठ्ठल गडदे (वय 29, रा. शेवाळवाडी, हडपसर) असे मृताचे नाव आहे. अशोक किसन शिंदे (वय 55) असे गुन्हा दाखल केलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. याप्रकरणी वर्षा गडदे (वय 29) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी बुद्रुक परिसरात इमारतीचे बांधकाम सुरू होते. त्यासाठी आरोपी अशोक शिंदे याने ठेका घेतला होता. मात्र, मजुरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्याने कोणतीही उपाययोजना केली नव्हती. त्यामुळे 28 ऑगस्टला कामावर विनाहेल्मेट असलेल्या विठ्ठलच्या डोक्यात लोखंडी सळई पडून गंभीररीत्या जखमी झाला. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी निष्काळजीपणा बाळगल्याप्रकरणी ठेकेदार अशोक शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा

Pune Crime : बुधवार पेठेत १० वर्षांत 61 बांगलादेशींना पकडले; दलालांकडून कामाचे प्रलोभन, मात्र वास्तव वेगळे

पिंपळनेर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

पिंपळनेर पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Back to top button